Chinese ‘Spy’ Balloon Shot Down: अमेरिकेने  फोडला 'स्पाय बलून' चीन खवळला (Watch  Video)
Chinese Spy Balloon (Photo Credit: Twitter)

अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिना भागात Atlantic Ocean जवळ Chinese surveillance balloon ला नष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेने केलेल्या या कारवाई मध्ये कोणतेही मानवी किंवा अमेरिकनचं वित्तीय नुकसान झालेले नाही. परंतू या प्रकारावर चीन कडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी या कारवाईचा अमेरिकेला परिणाम भोगावा लागेल असं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांच्या आदेशानुसार,अमेरिकन सैन्याने 2.39 EST वाजता अमेरिकन सागरी किनार्‍यापासून 6 माईल्स दूर असलेल्या Chinese surveillance balloon ला फोडण्यात आले.

Virginia च्या Langley Air Force Base वर फायटर एअरक्राफ्टने एका मिसाईलच्या फटक्यात फुगा फोडण्यात आला. त्याचा कचरा अमेरिकेच्या समुद्री भागात पडला आहे. अमेरिकन सैन्याच्या माहितीमध्ये या कारवाईमध्ये कोणत्याही अमेरिकन नागरिकाला, त्याच्या प्रॉपर्टीला नुकसान झालेले नाही.

चीनच्या नागरी मानवरहित एअरशिपवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने बळाचा वापर केल्याबद्दल बीजिंगने तीव्र असंतोष आणि विरोध व्यक्त केला आहे, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली आहे.

अमेरिकेचे Defence Secretary Lloyd Austin,यांनी दिलेल्या माहितीनुसार "People's Republic of China (PRC) कडून अमेरिकेमध्ये मोक्याच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्याच्या प्रयत्नात वापरल्या जाणार्‍या बलूनला अमेरिकेच्या प्रादेशिक पाण्याच्या वर खाली आणण्यात आले होते. चीनने दावा केला आहे की हा बलून केवळ हवामान संशोधन "एअरशिप" होता.

फुगा खाली पाडण्याची ही कारवाई कॅनडाच्या सरकारच्या समन्वयाने आणि पूर्ण सहकार्याने करण्यात आली. पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने त्यानंतर दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फुग्याच्या संवेदनशील माहितीच्या संकलनापासून संरक्षण करण्यासाठी तात्काळ पावले उचलली ज्यामुळे चीनची intelligence value कमी होते.