Tik Tok (Photo Credits-Gettey Images)

भारतात बॅन झाल्यानंतर आता टिकटॉक (TikTok Ban In India)  संबंधित आणखीन एक मोठी बातमी समोर येत आहे. टिकटॉक च्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेली माहितीनुसार, लवकरच टिकटॉक हॉंगकॉंग (Hong Kong) मधून एक्झिट घेण्याच्या विचारात आहे. चीनने (China) सेमी- ऑटोनॉमस शहरासाठी नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा स्थापन केल्यानंतर या प्रदेशातून बाहेर पडण्याचा निर्णय टिकटॉक तर्फे घेण्यात आला आहे. या कायद्यामुळेच फेसबुक (Facebook)  सहित अन्यही अनेक मोठ्या टेक कंपनी हॉंगकॉंग मध्ये काम थांबवण्याच्या विचारात आहेत. याबाबत टिकटॉकच्या अधिकाऱ्यांनी Reuters या वृत्तसंस्थेला सांगितले की, "मागील काळात घडलेल्या काही घटनांनुसार आम्ही हाँगकाँग मध्ये काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे" याबाबत सोमवारी 6  जुलै रोजी रात्री माहिती समोर आली. TikTok Goes Completely Offline in India: भारतातील वापरकरर्त्यांना टिकटॉक वर व्हिडिओ पाहणे किंवा अपलोड करणे झाले बंद!

ज्या निर्णयामुळे सर्व कंपन्या हाँगकाँग सोडण्याचा विचार करत आहेत तो निर्णय नेमका काय असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर, हा निर्णय म्हणजे, नवीन कायद्यानुसार हाँगकाँगमध्ये व्यवसाय करणार्‍या कंपन्यांना चीनी सरकारला वापरकर्त्यांचा डेटा द्यावा लागेल तसेच सेन्सॉरशिपच्या नियमाचे सुद्धा पालन करावे लागेल. यापूर्वी असा नियम नव्हता. किंबहुना टिकटॉक ची निर्मिती ही चीन मध्ये वापर करण्यासाठी झालीच नव्हती, त्याच अनुषंगाने त्याचे मार्केटिंग सुद्धा जागतिक ब्रँड म्हणून करण्यात आले होते. यानुसार टिकटॉकने यापूर्वी कधीच आपला डेटा चीन सरकार ला दिला नव्हता, किंवा सेन्सॉरशिप सुद्धा त्यांच्यावर लादण्यात आलेली नव्हती.

ANI ट्विट

टिकटॉक ने मागील सप्टेंबर मध्ये दिलेल्या माहितीनुसार, हॉंगकॉंग मध्ये या ऍपचे 150,000 युजर्स आहेत, हे आकडे जरी वाढत असले तरी मार्केट तुलनेने लहां व फार नफा मिकवून देणारे नाही. परिणामी कठोर नियम पाळण्याऐवजी या मार्केट मधून ऍप काढून घेणे फायद्याचे ठरेल आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.