Work From Home | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस महामामारी दरम्यान, अनेक कंपन्यांनी 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) प्रणाली राबवली. ज्यामुळे पाठिमागील अनेक वर्षांपासून नियमीतपणे संस्थेच्या कार्यालयात जाऊन काम करणाऱ्या मंडळींना घरुन काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान, 'वर्क फ्रॉम होम' प्रणालीद्वारे काम करताना कंपनीच्या कामाच्या वेळात कर्मचाऱ्यांनी भलत्याच गोष्टींना प्राधान्य दिल्याचे एका सर्व्हेत पुढे आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी घड्याळाच्या काट्यावर कामास प्राधान्य देण्याऐवजी जोडीदारासोबत लैंगिक संबंध (Sex During Work From Home), मद्यपाण (Drinking During Work From Home) आणि इतर गोष्टींचा लाभ घेतला. अमेरिकेतील एका कंपनीने केलेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती पुढे आली आहे.

यूएस आदाधारीत कंपनी travel points-savvy ने सुमारे 1,000 लोकांचा सर्व्हे केला. त्यामध्ये आढळून आले की, केवळ सातपैकी एक कर्मचारी कंपनीने नेमूण दिलेल्या एकूण तासांपैकी केवळ तीन ते चारच तास प्रत्यक्ष काम करत आहे.

कंपनीने आपल्या सर्व्हेमध्ये म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांनी 'वर्क फ्रॉम होम' संकल्पनेतून काम करताना मल्टीटास्कींग पद्धतीने काम केले. 10.5% कर्मचाऱ्यांनी दिलखूलासपणे प्रश्नांची उत्तरे दिली. जवळपास 11.8% लोकांनी सांगितले की, त्यांनी कंपीच्या कामाच्या वेळात दुपारी त्यांनी मद्यपान केले. ते कंपनीत असते तर असे करु शकले नसते.

कंपनीच्या कामाव्यतिरीक्त केलेल्या कामांमध्ये 71.6% कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांनी घरगुती कामे केली. जसे की, झाडू मारणे, भांडी घासणे. स्वयंपाक करणे, पाहुण्यांना वेळ देणे. लहान मुलांचा अभ्यास घेणे वगैरे. 24% कर्मचाऱ्यांनी तर सांगितले की, त्यांनी दुपारच्या वेळी चक्क दणकून झोप काढली. 23% लोक म्हणाले ते डॉक्टरांकडेही जाऊन आले. सर्वेक्षणात असेही आढळून आले की 74.7% ने स्क्रोल केले आहे. 'न्यू यॉर्क पोस्ट'ने याबाबत वृत्त दिले आहे.

सर्व्हेमध्ये पुढे आले की, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या एकूण 10 पैकी तीन कर्मचारी केवळ ऑनलाईन अस्तित्व दाखविण्यासाठी किंवा त्यांच्या वरिष्ठांच्या नजरेला पडण्यासाठी माऊस हालवून आपली उपस्थिती दर्शवतात. आपल्या बॉसला दूर ठेवण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. सर्व्हेक्षणामध्ये असेही आढळून आले आहे की, अनेक कर्मचारी हे आपल्या घरापेक्षा इतर ठिकाणीच जाऊन काम करतात. ज्यात काही कौटुंबीक सहलीवर असतात. काही आपल्या नातेवाईकांकडे गेलेले असतात. काहींनी कॉफीशॉपमधून काम करण्यास प्राधान्य दिले. तर काहंनी आपल्या मित्रांच्या घरुन काम करण्यास प्राधान्य दिले.