Sex Ban for Vaccinated: कोरोना विरोधी लस घेतल्यावर 3 दिवस 'सेक्स' करण्यास मनाई; Russian सरकारने जारी केला आदेश, जाणून घ्या कारण
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) जगातील अनेक सामर्थ्यवान देशांनीही विध्वंस पाहिला आहे. अमेरिका आणि रशिया (Russia) यांसारख्या महासत्ता देशांनीही या साथीसमोर गुडघे टेकले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी भारतासह जगात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. लस घेतलेल्यांना काही काळ त्यांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. आता रशियामध्ये लस घेतल्यानंतर लोकांना तीन दिवस सेक्स (Sex) करण्यास मनाई आहे. लसीकरणानंतर लोकांचा शारीरिक ताण कमी करण्यासाठी रशियन सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, लसीकरण झाल्यानंतर शारीरिक ताणामुळे लसीचा प्रभाव कमी होऊ नये म्हणून, हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियन आरोग्य अधिकार्‍यांनी हा आदेश जारी केला आहे. सेराटोव्ह प्रांताचे उप आरोग्यमंत्री डॉ. डेनिस ग्रेफर म्हणाले की, लसीकरणानंतर लोकांनी सेक्ससह इतर 'शारीरिक ताणतणाव' टाळले पाहिजेत. याआधी रशियन लोकांना लसीकरणानंतर ताबडतोब व्होडका घेणे, धूम्रपान व सौनाला भेट देणे टाळण्याचा सल्ला दिला होता.

पत्रकार परिषदेत डॉ. ग्रेफर म्हणाले, 'प्रत्येकालाच माहित आहे की सेक्स करण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागते. म्हणूनच आम्ही लोकांना लस घेतल्यानंतर लैंगिक क्रियेसारख्या शारीरिक तणावापासून दूर राहण्याचा इशारा देत आहोत. ग्रेफर यांच्या  यांच्या विधानावर तिथल्या माध्यमांमध्ये टीका होत आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ओलेग कोस्टिन यांनी सांगितले की, ते ग्रेफर यांच्या विधानाशी सहमत नाहीत. कोस्टिन म्हणाले की, लस घेतल्यानंतर पूर्णपणे सेक्स बंद करण्याऐवजी आपण तो काळजीपूर्वक करू शकता. (हेही वाचा: डेल्टा प्लस प्रकार हा अल्फा प्रकाराच्या तुलनेत 40-60 टक्के अधिक संसर्गजन्य- INSACOG चे सह-अध्यक्ष डॉ.एन.के.अरोरा)

दरम्यान, रशिया हा अशा देशांपैकी एक आहे जेथे लसीकरणाचा दर खूपच कमी आहे. देशात आतापर्यंत केवळ 13 टक्के लोकांनाच लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. इतर युरोपियन देशांमध्ये ही संख्या सरासरी 30 टक्क्यांहून अधिक आहे. लसीकरणाच्या संथ गतीबद्दलही रशियाला टीकेचा सामना करावा लागत आहे. रशियामध्ये स्पुतनिक व्ही ही लस दिली जात आहे.