पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Order of Zayed या UAE च्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव
PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा UAE मधील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ जायद'  (Order of Zayed) देऊन आज (24 ऑगस्ट) करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवलेले मोदी हे पहिले भारतीय नेते ठरले आहेत. अबु धाबीमध्ये (Abu Dhabi) पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये क्राउन प्रिंस शेख मोहम्मद बिन जायद यांच्याशी मोदी यांनी भारत व युएई यांच्या संबंधांवर चर्चा केली. 'जायद मेडल' हा UAE चा सर्वोच्च सम्मान राजकारणी, राष्ट्रपति आणी राष्ट्र प्रमुखांना दिला जातो.

'ऑर्डर ऑफ जायद' या पुरस्काराने गौरवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भारतातील विविधतेत असलेल्या एकतेला सलाम करता हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून 130 कोटी भारतीयांच्या वतीने स्वीकारत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

नरेंद्र मोदी यांचे ट्वीट 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यूएई मध्ये 'रुपे' कार्ड लॉन्च केलं आहे. याद्वारा युएईमध्ये दुकानात, मॉलमध्ये आर्थिक व्यवहार भारतीय डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून करता येऊ शकतो.  आता मोदी बहरीनच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुढील 2 दिवस ते बहरीनमध्ये असतील.

नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा UAE दौरा आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मोदी युएईमध्ये आले होते तेव्हा त्यांनी युएईच्या युवराजांसोबत चर्चा केली होती. तर ऑगस्ट 2015 साली मोदी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून युएई दौर्‍यावर आले होते. भारत आणि युएई एकमेकांसोबत उर्जा, श्रमशक्ती, आर्थिक सेवा यांच्यासह अनेक क्षेत्रात एकमेकांचे साथिदार आहेत.