US Horror: अमेरिकेतील पाश्चात्य संस्कृतीचा जीवघेणा परिणाम नव्या पिढीला भोगावा लागत असल्याचे एका घटनेतून समोर आले आहे. ओहायो (Ohio)येथील करीम केइटा या एक वर्षाच्या चिमुकल्याला , ज्याने जग अजून नीट पाहिले नव्हते. त्याला आईच्या प्रियकर(Lover)मुळे जीव गमवावा लागला. एडवर्ड मरे, वय 23, असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 5 मे रोजी घडली. एडवर्ड मरे याने केलेल्या मारहाणीत करीम गंभीर जखमी झाला होता. निघृण मारहाणीमुळे करीमच्या मेंदूला ईजा झाली(Brain Damage). मेंदूतून रक्स्त्राव झाला, त्याच्या नाजूक बरकड्या तुटल्या, इतकेच नव्हेतर त्याला हृदयविकाराचा झटका आला(Cardiac Arrest)आणि त्यात त्याने दम तोडला. सध्या आरोपी एडवर्ड मरे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर हत्येसह अन्य कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा:Brazil Shocker: मोबाईल काढून घेतल्याच्या रागात 16 वर्षीय मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं; गोळ्या झाडून आई, वडीलांसह बहिणीची हत्या )
हॅमिल्टन काउंटी प्रॉसिक्युटिंग ॲटर्नी, मेलिसा पॉवर्स यांनी सांगितले की, 5 मे रोजी करीम घरी प्रतिसाद देत नसल्याचे आढळले. त्यावर तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले. करीमची आई, अमिनाता कीटा, मरेला गेल्या तीन महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे मरे अनेक वेळी त्यांच्या घरी येत होता. 1 मे रोजी करीम घराबाहेर खेळत असताना मरे याने करीमला घरात आणले आणि त्याला त्याच्या रूममध्ये नेले. तिथे दोघे एकचा रूममध्ये बराच वेळ होते असे सांगितले आहे.
वैद्याकिय अहवालातून असे समोर आले आहे की, करीमला निघृण मारहाणीमुळे त्याच्या मेंदूला सूज आली, मेंदूला ईजा झाली. मेंदूतून रक्स्त्राव झाला, त्याच्या नाजूक बरकड्या तुटल्या, यकृत खराब झाले, डोळ्याच्या ऊतींना रक्तस्त्राव झाला इतकेच नव्हेतर त्याला हृदयविकाराचा झटका आला हे सर्व तो सहन न करू शकल्यामुळे यात त्याचा मृत्यू झाला. सिनसिनाटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की एक वर्षाच्या मुलावर झालेल्या जखमा “फक्त हिंसक आघातामुळे किंवा प्रसूती झालेल्या समस्यांमुळे होतात.” यात घटना प्रसूतीशी जोडता येणार नाही. त्यामुळे त्यांनी करीमच्या मृत्यूला हत्या ठरवले.
वकिलांनी सांगितले की, मरेवर हत्येचे दोन गुन्हे, एक प्राणघातक हल्ला आणि अन्य एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.