COVID-19 मुळे लॉकडाऊनच्या काळात न्यूयॉर्क च्या आरोग खात्याने नागरिकांना दिला हस्तमैथुनाचा सल्ला, ट्विटच्या माध्यमातून दिली माहिती
Masturbation representational image (Photo credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे लोक घरीच राहिले आहेत. यातील अनेक जग 'Work From Home' च्या माध्यमातून ऑफिसचे काम घरीच आहेत तर काही जण आपल्या ऑफिसच्या ज्येष्ठांसोबत व्हिडिओ कॉलिंग, चॅटद्वारे संपर्कात आहे. अशा स्थितीत जे लोक निव्वळ घरात अडकून पडले आहे त्यांनी काय करावे याबाबत सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक पद्धतीने मार्गदर्शन केले जात आहे. अशा वेळी ज्यांनी सेक्सची इच्छा होत आहे त्यांनी केवळ कोरोना च्या भीतीपायी सेक्स करणे सोडून दिले आहे. तर काहींनी काही काम नाही म्हणून आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत असतील असे साधारण चित्र आहे. याचा अंदाज कंडोमच्या विक्रीवरून अनेकांना आलाच असेल. याउलट खबरदारीचा उपाय म्हणून न्यूयॉर्क सरकारने एक वेगळाच उपाय सांगितला आहे.

लॉकडानच्या काळात तुम्ही हस्तमैथुन (Masturbation) करु शकता असा सल्ला दिला. हस्तमैथुनाने कोरोनाचा फैलाव होत नाही त्यामुळे हे सुरक्षित आहे असे न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याने (New York Health Department) ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. Coronavirus Outbreak: अमेरिकेमध्ये Social Distancing 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याचे आदेश

पाहा ट्विट:

हेदेखील वाचा- Coronavirus: बाजारात कंडोमच्या तुटवड्यामुळे बाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता, तज्ञांनी व्यक्त केले मत

हस्तमैथुन करण्याआधी तुमचे हात वा सेक्स टॉईज साबणाने स्वच्छ धुवावे ज्याने करुन कोविड-19 चा फैलाव होणार नाही, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. अशा परिस्थितीत दुसरं कोणी नाही, तर तुम्हीच तुमचे सुरक्षित सेक्स पार्टनर आहात असा सल्ला ही या ट्विट मधून देण्यात आला आहे.

त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात व्हिडिओ चॅट, सेक्सटिंग हे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत असे न्यूयॉर्क आरोग्य खात्याने सुचविले आहे.

दिवसागणिक अमेरिकेमध्ये कोव्हिड 19 या आजाराने मृत्यूमुखी पडणार्‍यांचा संख्या वाढत आहे. अशामध्येच लॉकडाऊनला विरोध करणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये सोशल डिस्टन्सिंगची कालमर्यादा 30 एप्रिल पर्यंत वाढवत असल्याचं म्हटलं आहे. सध्या अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांपैकी 24,000 लोकांनी आपला जीव गमावला आहे.