Coronavirus: बाजारात कंडोमच्या तुटवड्यामुळे बाळांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता, तज्ञांनी व्यक्त केले मत
Photo Credits: Pixabay

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने जीवनावश्यक वस्तू बाजारातून विकत घेता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.ऐवढेच नाही तर मॉल्स, स्विमिंग पूल, ऑफिसे बंद ठेवण्यात यावीत असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घरातूनच कामकाज करत आहेत. याच पार्श्वभुमीवर अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत कंडोमचा समावेश करणे कठीण असून त्याचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. याच कारणास्तव आता नवजात बाळांच्या संख्येत अधिक वाढ होईल अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

तर चीन येथे प्रथम लागण झालेल्या कोरोना व्हायरसच्या शहराच कंडोमची संख्या वाढवण्याची गरज होती. Condomsales.com यांच्या रिपोर्टनुसार, 3 मार्चला कंडोमचा बाजारातील पुरवठा पाहता तो अपुरा पडल्याचे सिंगापूर आणि हॉंगकॉंग येथे दिसून आले. त्यानंतर ई-कॉमर्स वेबसाईट्स Pinduoduo यांनी असे नोटीस केले की, चीन येथे नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवले जात असल्यानंतर कंडोम आणि हेअर क्लिपच्या विक्रीत अधिक भर पडल्याचे abacusnews.com यांनी म्हटले आहे. यासाठी अजून एक कारण म्हणजे आशियाई खंडातील देशातील नागरिक कोरोनाच्या भीतीपोटी कंडोम बोटांत घालत असल्याची अफवा सोशल मीडियात पसरल्याचे मिरर यांनी दिलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते.(Coronavirus And Sex: संभोग केल्याने कोरोना व्हायरस होतो का? अनेकांना पडलाय प्रश्न, उत्तर काय?)

 मलेशिया येथील केरेक्स (Karex) ही जगातील सर्वात मोठी कंडोम तयार करणारी कंपनी असल्याचे फोर्ब्स यांनी म्हटले आहे. त्यामुळे कंडोमचा तुटवडा निर्माण झाल्यास त्याचा जागतिक स्तरावर परिणाम होतो. युनायटेड स्टेट्स मध्ये जेव्हा कोरोनाचा प्रथम रुग्ण आढळल्यानंतर कंडोमच्या विक्रीत अधिक वाढ होत आहे. तर Dr. Mehmet Oz यांनी द मर्क्युरी न्यूज यांच्याशी बोलताना असे म्हटले आहे की, नागरिकांना क्वार्टनटाइन केल्याने ते घरात सेक्स करणारच. त्यामुळे नवजात बालकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.असोसिऐट प्रेस यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत आपत्तीजनक घटना आणि नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिकांना घरातच रहावे लागले होते. त्यामुळे जन्मदरात वाढ झाली. परंतु आता कोरोना व्हायरमुळे पुन्हा जन्मदारात येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.