सोमवारी सकाळी नॅशव्हिले येथील एका खाजगी ख्रिश्चन शाळेत झालेल्या गोळीबारात जवळजवळ 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. नॅशव्हिले पोलिसांनी सांगितले की, ही ख्रिश्चन शाळा प्रीस्कूल पासून 6 व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देते. या ठिकाणी आज सकाळी गोळीबार झाला. त्यानंतर मेट्रोपॉलिटन नॅशविले पोलीस विभागाशी झालेल्या चकमकीमध्ये शुटरचा मृत्यू झाला. व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरचे प्रवक्ते जॉन होसर यांनी सांगितले की, मृतांमध्ये मुलांचा व काही प्रौढांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)