Jackpot (Photo Credit: Getty)

अमेरिकेत (America) घटस्फोट (Divorce) घेताना सामान्यत: पतीला आपल्या संपत्तीमधील अर्धा वाटा पत्नीला देणे बंधनकारक असते. मात्र याच नियमामुळे एक पती आणि कोर्टही अडचणीत आले आहे. घटस्फोटाची प्रक्रिया चालू असताना एका पतीला तब्बल 565 कोटींची लॉटरी (Lottery) लागली. आता पत्नीने या पैशांवर आपला हक्क सांगितला आहे. सध्याच्या नियमानुसार न्यायालयानेही या लॉटरीमधील अर्धी रक्कम पत्नीला देण्याचे आदेश दिले आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, 2011 मध्ये रिचर्ड (Richard) आणि मेरी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात पोहचले होते. 2018 पर्यंत ही घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. या दरम्यान 2013 साली विकत घेतलेल्या लॉटरी तिकिटावर हे बक्षीस मिळाले आहे.

अमेरिकेतील मिशिगन (Michigan) येथील रिचर्ड डिक जेलास्को यांनी आपली पत्नी मेरी जेलास्को हिच्याशी घटस्फोट घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी  न्यायालयामध्ये अर्ज केला होता. कोर्टाची कारवाई आणि घटस्फोटाची प्रक्रिया चालू होती. या दरम्यान रिचर्डला $ 80 दशलक्ष (सुमारे 565 कोटी) ची लॉटरी लागली. आता या लॉटरीतून प्राप्त झालेल्या पैशामधील अर्धी रक्कम पत्नीला द्यावी की नाही याबाबत न्यायालयादेखील अडचणीत आले आहे.

बरीच चर्चा विनिमय झाल्यानंतर 13 जून रोजी, कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या पॅनेलने असे ठरवले की, रिचर्डने लॉटरीमधून मिळालेल्या अर्ध्या पैशांची रक्कम पत्नी मेरी हिला देणे गरजेचे आहे. याबाबत न्यायालयाने सांगितले, ‘जेव्हा पती पत्नी एकत्र राहतात तेव्हा पत्नी पतीला अनेक वाईट आणि दुखःद क्षणांत साथ देते. त्यामुळे आता अशा आनंदाच्या क्षणी पतीनेही पत्नीला साथ दिली पाहिजे.’ मात्र रिचर्डचे वकील अटॉरनी स्कॉट बेसेट यांनी असा युक्तिवाद केला आहे की, ही लॉटरी दोघे वेगळे झाल्यानंतर लागली आहे. हे रिचर्डचे नशीब आहे त्यात त्याच्या पत्नीचा कोणताही सहभाग नाही. त्यामुळे पत्नीला काहीही मिळता कामा नये.'