Man Mixed His Own Sperm With Father's: स्वतःच्या मुलाचे पालक होणे ही अनेकांसाठी महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. मात्र जगात अशी अनेक जोडपी आहेत जी मुलांना जन्म देऊ शकत नाही. अशावेळी आयव्हीएफसारखे (IVF) तंत्रज्ञान मदतीला येते. मात्र हे तंत्रज्ञान इतके महाग आहे की सर्वसामान्य लोकांना ते परवडेल असे नाही. इंग्लंडमध्ये (UK) असेच एक जोडपे आहे, जे मुलाला जन्म देऊ शकत नाही आणि त्यांना आयव्हीएफचा खर्चही झेपण्यासारखा नव्हता, अशावेळी मूल होण्यासाठी या जोडप्याने केलेली क्लुप्ती ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
इंग्लंडमधील या व्यक्तीने पत्नीला गरोदर राहण्यास मदत करण्यासाठी चक्क त्याचे स्वतःचे वीर्य त्याच्या वडिलांच्या विर्यामध्ये मिसळले. कायदेशीर कारणास्तव या व्यक्तीचे नाव दिले गेले नाही, आणि कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये त्याची ओळख फक्त PQ म्हणून आहे. द गार्डियनने याबाबत वृत्त दिले आहे.
रिपोर्टनुसार, पीक्यू आणि त्याची पत्नी जेके यांना गर्भधारणा संबंधित समस्या होत्या. म्हणून त्यांनी पीक्यूचे शुक्राणू त्याच्या वडिलांच्या (आरएस) शुक्राणूमध्ये मिसळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे शुक्राणू महिलेमध्ये इंजेक्ट करण्यात आले. याबाबत न्यायाधीशांनाही माहिती देण्यात आली आणि ती नेहमीच गुप्त ठेवण्याचा हेतू होता. गर्भधारणेनंतर, महिलेने एका मुलाला जन्म दिला, जो आता पाच वर्षांचा आहे. (कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये मुलाचे नाव डी आहे).
पुढे स्थानिक कौन्सिलला या महिलेच्या गरोदरपणाच्या परिस्थितीबाबत माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी मुलाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. याबाबत स्थानिक कौन्सिलने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि डीचे वडील कोण आहेत हे जाणून घेण्यसाठी डीएनए चाचणीची घेण्याचे निर्देश देण्याचे विनंती केली. मात्र, परिषदेला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत न्यायमूर्तींनी गुरुवारी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, डीला त्याचे जैविक पिता कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा असू शकते, परंतु परिषदेला तसे करण्याचा अधिकार नाही.