Kulbhushan Jadhav Case | File Image | (Photo Credits: PTI)

पाकिस्तानमध्ये अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दुसर्‍यांदा Consular Access देण्यात आला आहे. दरम्यान याबाबतचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय उच्चायुक्त वकिल त्यांच्या भेटीला पोहचले आहेत. मात्र त्याची माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान काल कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेविरूद्ध अपिल करण्यासाठी परवानगी दिली आहे.

कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरी आणि आतंकवाद याचा आरोप आहे. याप्रकरणी एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानी सैन्य न्यायालयाकडून त्यांना मृत्यूदंड ठोठावला होता. त्यानंतर हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचलं आहे.

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला त्यांची शिक्षा कमी करण्याचा आणि लवकरात लवकर काऊन्सर अॅक्सेस देण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून भारत या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करत आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी निगडीत कोणत्याही बाबतीत सामंजस्य करार करण्यास नकार दिला आहे. तसंच सप्टेंबर 2019 मध्ये पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दुसरा कॉऊन्सलर एक्सेस देण्यास नकार दिला होता.

कुलभुषण जाधव यांचे बालमित्र अरविंद जाधव यांनी एनएनआयला दिलेल्या माहितीमध्ये मागच्या वेळे जेव्हा कुलभूषण यांना काऊन्सलर एक्सेस दिला होता तेव्हा त्याच्या आई,पत्नी वडिल यांच्यासोबतच भारतासाठी अपमानकराक होता. त्यामुळे आता तो देताना बिनाशर्त देण्यात यावा.

कुलभुषण जाधव 2016 पासून पाकिस्तानमध्ये आहेत. त्यांच्यावर हेरगिरीची आरोप आहे. मात्र भारताने हा दावा नाकारला आहे. 2017 पासून आयसीजे मध्येही हे प्रकरण सुरू आहे. मागील वर्ष आंतरराष्ट्रीय न्यायालयाने देखील फाशीच्या शिक्षेवर पुर्विचार करावा असे म्हटले आहे.