Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतात घडलेल्या एका भीषण घटनेत, एका व्यक्तीने आपल्या पत्नीला त्याच्या सहा मुलांसमोर कढईत उकळले. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत नर्गिसचा मृतदेह एका खाजगी शाळेच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या मोठ्या 'कढई'मध्ये सापडला होता. ही शाळा गुलशन-ए-इकबाल परिसरातील ब्लॉक 4 मध्ये आहे. या दाम्पत्याच्या 15 वर्षीय मुलीने पोलिस हेल्पलाइनला घटनेची माहिती दिली.  यानंतर मोबिना पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पूर्व कराचीचे एसएसपी अब्दुर रहीम शेराझी यांनी सांगितले की, मृत महिलेचा पती, बाजौर एजन्सीमधील आशिक हा शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता आणि तो आपल्या कुटुंबासह नोकर क्वार्टरमध्ये राहत होता.

गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून ही शाळा बंद असल्याचे त्यांनी सांगितले. या भीषण घटनेनंतर आरोपी चौकीदार आपल्या तीन मुलांसह फरार झाला. अन्य तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसएसपी शेराझी म्हणाले, ते हादरलेले आणि आघात झाले आहेत. प्राथमिक तपासात आणि मुलांच्या जबाबावरून संशयित आरोपीने आधी पत्नीचा उशीने गळा आवळून खून केला. हेही वाचा Crime: कॉर्न पिझ्झा न दिल्याने डॉमिनोजच्या शेफला मारहाण, तीन आरोपींना अटक

यानंतर मुलांसमोर कढईत तिला उकळले. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजनुसार, पतीने पत्नीला इतर लोकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले. ती यासाठी तयार नसताना त्याने तिची हत्या केली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.