 
                                                                 चीन (China) मध्ये सध्या आफ्रिन स्वाईन फीवर (African Swine Fever) ने डोके वर काढले आहे. त्यामुळे चीनमधील मृतांच्या आकड्याने शंभरी गाठली आहे. या आजारामुळे 9,16, 000 डुकरांची कत्तल करण्यात आली आहे. तर सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.
गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात स्वाईन फीवर चीनच्या काही भागात पसरला होता. त्यामुळे पोर्क व्यापाऱ्यांमध्ये निराशा दिसून आली होती. तसेच चीनमध्ये पोर्कचे मोठा बाजार असल्याने त्याला जबरदस्त फटका बसला होता. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिन स्वाईन फीवरच्या आजाराचा धोका सर्वाधिक डुकरांना असतो. या आजारवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने चक्क डुकरांचा बळी देण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात तैवान सरकारने चीनला याबाबत सांगितले होते. तसेच डुकरांचा आजार हा हलगर्जीपणाने घेऊ नका अशी समज दिली होती. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात डुकरांची मागणीत घट होईल म्हणून चीनने तैवान सरकारकडे दुर्लक्ष केले होते.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
