Ethiopia: पूर्व आफ्रिकी देश इथिओपिया मध्ये प्रवासी बसवर बंदूकधार्‍यांचा भीषण हल्ला; 34 नागरिक ठार
Flag of Ethiopia (Photo Credits: Wikimedia Commons)

पश्चिम इथिओपिया (Ethiopia) येथे प्रवासी बसवर झालेल्या भीषण हल्ल्यात बंदूकधारकांनी कमीतकमी 34 लोक ठार मारले आहे. या भागातल्या नागरिकांवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेने रविवारी सांगितले. इथिओपियन मानवाधिकार आयोगाने (EHRC) एका निवेदनात म्हटले आहे की, बेनिशांगुल-गुमुज (Benishangul-Gumuz) प्रदेशात शनिवारी रात्री झालेल्या हल्ल्यामध्ये मृतांची अंदाजे संख्या सध्या 34 आहे व ती वाढण्याची शक्यता आहे. कमिशनच्या प्रवक्त्याने या घटनेची पुष्टी केली आहे. ईएचआरसीच्या निवेदनात म्हटले आहे की, बस हल्ला हा डिबेट प्रशासकीय भागात झाला आणि इतर तीन भागातही अशाच हल्ल्याची नोंद झाली आहे.

पंतप्रधान अबी अहमद सरकारने बेनिशांगुल-गुमुज येथे विशेषत: मेटेकल झोनमध्ये झालेल्या अलीकडील हिंसाचाराविषयी माहिती दिली आहे. ऑक्टोबरमध्ये झोनमध्ये झालेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले होते, तर सप्टेंबरच्या उत्तरार्धात अशाच हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबरमध्ये सभासदांना संबोधित करताना अबी म्हणाले की, या हत्येस जबाबदार असलेले लोक शेजारील सुदानमध्ये प्रशिक्षण आणि निवारा घेत आहेत आणि हा परिसर स्थिर करण्यासाठी खार्तूमच्या मदतीची आवश्यकता आहे. (हेही वाचा: Typhoon Vamco in Philippines: फिलिपाईन्समध्ये वामको चक्रीवादळाचा हाहाकार; तब्बल 67 लोकांचा मृत्यू, 12 जण बेपत्ता)

बेनिशांगुल-गुमुजमधील हिंसाचार आणि इथियोपियाच्या उत्तरी तिग्रे भागात सैन्य कारवायांदरम्यान, कोणताही ज्ञात दुवा नाही. यामुळे शेकडो ठार झाले आहेत आणि 20,000 हून अधिक लोकांना सीमेवरुन सुदानमध्ये पलायन करण्यास भाग पडले आहे. दरम्यान, याआधी 2 आठवड्यांपूर्वी इथिओपियात, एका सशस्त्र बंडखोर गटाने तीन गावात हल्ला केला होता. यामध्ये कमीतकमी 54 लोक ठार झाले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार, बंदूकधार्‍यांनी ओरोमिया प्रदेशातील अमहरा वंशीय समुहाला लक्ष्य केले आणि त्यांच्या 20 पेक्षा जास्त घरात आग लावली होती.