Nobel Prize 2024 in Economics: यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक (Nobel Prize in Economics) डॅरॉन एसेमोग्लू (Daron Acemoglu), सायमन जॉन्सन (Simon Johnson) आणि जेम्स ए. रॉबिन्सन (James A. Robinson) यांना जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रांमधील समृद्धीमधील फरकांवर संशोधनासाठी या शास्त्रज्ञांना हे नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. या सर्वांनी संस्था कशा तयार होतात आणि त्यांचा समृद्धीवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास केला.
रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने म्हटले आहे की, तीन अर्थशास्त्रज्ञांनी देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व दाखवून दिले आहे. स्टॉकहोममध्ये सोमवारी नोबेल पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. यातील डॅरॉन एसेमोग्लू आणि जॉन्सन मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात. तसेच रॉबिन्सन शिकागो विद्यापीठात संशोधनाचे काम करतात. (हेही वाचा - Nobel Prize in Literature 2024: यंदाचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार South Korean लेखिका Han Kang यांना जाहीर)
राष्ट्रांमधील समृद्धीमधील फरकांवर संशोधनासाठी मिळाले अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक -
Nobel Prize in Economic Sciences goes to Daron Acemoglu, Simon Johnson and James A. Robinson “for studies of how institutions are formed and affect prosperity.”
(Pic: The Nobel Prize/X) pic.twitter.com/7TJlF9gWN1
— ANI (@ANI) October 14, 2024
दरम्यान, अर्थशास्त्र पुरस्कार पूर्वी बँक ऑफ स्वीडन पुरस्कार म्हणून ओळखला जात असे. आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ आर्थिक विज्ञानासाठी हा पुरस्कार दिला जातो. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ बँक ऑफ स्वीडनने 1968 मध्ये याची सुरुवात केली. आल्फ्रेड नोबेल हे 19व्या शतकातील व्यापारी आणि रसायनशास्त्रज्ञ होते, ज्यांनी डायनामाइटचा शोध लावला.