चीनमधील वुहान (Wuhan City) शहर हे आज जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसचं (Coronavirus) उत्पत्ती केंद्र. आता या शहरात मागील 76 दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाऊन अखेर उठवण्यात आला आहे. नागरिकांना आता शहरात पुन्हा फिरण्याची मुभा देण्यात आली असली तरीही काही गोष्टींबबतअजूनही सतर्कता पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 11 मिलियन लोकसंख्या असलेल्या वुहानमध्ये डिसेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा कोरोना बाधित आढळला होता. त्यानंतर 23 जानेवारीपासून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी WHO सुद्धा दोषी? चीनच्या ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी.
8 एप्रिल पासून वुहान शहरातून बाहेर पडण्यासाठी निरोगी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. हुबई प्रांतामध्ये आता हळूहळू रेल्वेसेवा, विमानसेवा आणि हायवेवरील वाहतूक खुली करण्यात आली आहे. दरम्यान आज सुमारे 55,000 नागरिक वुहानमध्ये ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.
25 मार्चला हुबई प्रांतामध्ये वुहान वगळता लॉकडाऊन उघडण्यात आला होता. सध्या वुहानमध्ये नागरिकांना हिरव्या रंगाचं क्युआर कोड कार्ड देण्यात आलं आहे. ज्य नागरिकांकडे आहे त्यांचं आरोग्य उत्तम आहे असा त्याचा अर्थ होतो. दरम्यान या नागरिकांना सध्या वुहानमध्ये फिरण्यास परवानगी आहे.
आज कोरोना व्हायरसबाधितांचा आकडा जगभरात 14 लाखांच्या वर पोहचला आहे. चीनमध्ये 81,802 बाधित आहेत. त्यापैकी सध्या 1,190 जणांवर उपचार सुरू असून काल 24 तासात एकही मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याची माहिती चीनकडून देण्यात आली आहे.