प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus)  मुळे जगभरातील अर्थव्यवस्था (Economy)  संकटात आल्या आहेत. अनेकांंचे नोकरी सुटलीये, व्यवसाय ठप्प पडले आहेत. अशावेळी नोकरी आणि शिक्षण सांंभाळणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नेहमीचा खर्च चालवणं सुद्धा कठीण होऊन बसले आहे. अशावेळी काही ना काही मार्ग शोधण्यासाठी सर्वच जण हातपाय मारत आहेत. याच अनुषंंगाने झालेल्या एका निरिक्षणात प्रत्येकी 10 पैकी 1 विद्यार्थी हा आर्थिक संकट दुर करण्यासाठी सेक्स वर्कर (Sex Worker) म्हणुन काम करण्याचा विचार करत आहे. सेव्ह द स्टुडंंट (Save The Student)  या संंस्थेने हे सर्वेक्षण केले होते. यासाठी 3,161 विद्यार्थ्यांंना एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात सवाल करण्यात आले होते. यात समोर आलेल्या माहितीनुसार, प्र्त्येकी 20 पैकी 1 जणाने अगोदरच असे सेक्स वर्क केलेले आहे तर 10 पैकी 1 जण असे काम करण्याचा विचार करत आहे.

यामध्ये सविस्तर चर्चा केल्या असता, विद्यार्थ्यांंनी सांंगितले की, सेक्स वर्क म्हणजे प्रत्यक्ष सेक्स करणेच नाही उलट यापैकी अनेकांंनी आपले खाजगी फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करुन पैसे मिळवले आहे. हे फोटो विकण्यासाठी ही मंंडळी OnlyFans चा सर्वाधिक वापर करत आहेत. या एकट्या वेबसाईट च्या व्यवसायात मार्च पासुन 75% वाढ झाली आहे. XXX Videos & Photos on OnlyFans: मॉडेल ने M&S मधील जॉब सोडुन स्वतःचे न्युड फोटो विकायचं ठरवलं, आता वर्षाला कमावते 1 कोटी

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांंना अजिबातच परवडत नाहीये अशांंनी तर विद्यापीठ सोडण्याचा सुद्धा मार्ग निवडला आहे. अशा विद्यार्थ्यांंची टक्केवारी सुद्धा 59% वर पोहचली आहे. 36% विद्यार्थ्यांनी पैशामुळे तर 55% विद्यार्थ्यांंनी मानसिक तणावामुळे शिक्षण सोडत असल्याचे म्हंंटले आहे.