Barbecue Restaurant Blast | (Photo Credit - Twitter)

Blast at Fuyang Barbecue Restaurant in Yinchuan City: वायव्य चीनच्या यिनचुआन शहरात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटात (China Restaurant Blast) 31 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची संख्या समजू शकली नाही, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी भोजनालये आणि मनोरंजनाची ठिकाणे देखील आहेत. प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री 8:40 च्या सुमारास (1240 GMT) हा स्फोट निंग्झिया स्वायत्त प्रदेशाची राजधानी यिनचुआनच्या (Yinchuan) डाउनटाउनमधील निवासी भागातील फुयांग बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये झाला.

वृत्तसंस्था शिन्हुआने प्रादेशिक कम्युनिस्ट पक्षाच्या समितीचा हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रेस्टॉरेंटमध्ये असलेल्या लिक्विफाइड पेट्रोलियम गॅसच्या गळतीमुळे हा स्फोट झाला. बार्बेक्यू रेस्टॉरंटच्या ऑपरेशन दरम्यान स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत सात जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या संख्येबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, जखमींचा जेवढा आकडा सांगीतवला जात आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. आणखी दोन व्यक्तीसुद्धा या घटनेत जखमी झाले होते. मात्र, या जखमा किरकोळ स्वरुपाच्या होत्या. खिडकीचे तावदान फुटल्याने त्यांच्यावर ओरखडे आले होते.

व्हिडिओ

सरकारने ठिकठिकाणी तैनात केलेल्या अनेक सीसीटीव्हींपैकी एकासीसीटीव्हीवरील फुटेजमध्ये रेस्टॉरंटच्या दर्शनी भागात असलेल्या एका छिद्रातून धूर निघत असताना आणि एक डझनहून अधिक अग्निशामक घटनास्थळी काम करत असल्याचे दिसून आले, असेही शिन्हुआच्या वृत्तात म्हटले आहे.