
इजिप्तच्या (Egypt) पुरातत्व अभियाना अंतर्गत कैरोच्या दक्षिणेस नेक्रोपोलिस येथे 59 जुन्या सारकोफागी (Sarcophagi) आणि पुतळे यांचा मोठा संग्रह शोधला आहे. इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांनी (Archaeologists) शनिवारी सांगितले की, या उत्तमरीत्या जतन केलेल्या आणि सीलबंद लाकडी शवपेट्या साधारण 2500 वर्षे जुन्या असल्याचा अंदाज आहे. या सजवलेल्या सारकोफागी माध्यमांसमोर उघड करताना टीमने सांगितले की, ममीफाइड (Mummified) कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या असतात तेजस्वी रंगात या हायरोग्लिफिक शिलालेख सारख्या दिसतात. हे प्राचीन इजिप्शियन राजधानी कैरोच्या दक्षिणेस, मेम्फिसच्या नेक्रोपोलिस, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या साकरामधील एका मोठ्या दफनभूमीत सापडल्या आहेत.
गिझाच्या पिरॅमिडच्या दक्षिण-पूर्वेस दहा मैल अंतरावर या पेंट केलेल्या शवपेटी आहेत. यातील 40 प्रदर्शित करण्यात आल्या. इजिप्तच्या समाजातील हे उच्च अधिकारी व कुलीन लोक असण्याचा अनुमान आहे. या सर्वांच्या मृत्यूनंतर, त्यांना इजिप्तच्या प्राचीन अध्यात्म अंतर्गत दफन केले गेले असावे, ज्यात त्यांचे मेंदू लोखंडी हुकांनी काढून टाकले गेले होते. ‘या शोधाबद्दल आम्हाला फार आनंद झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया पुरातन वास्तूंच्या सर्वोच्च परिषदेचे सरचिटणीस मुस्तफा वजीरी यांनी दिली.
पहिल्या 13 शवपेटींचा शोध जवळपास तीन आठवड्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर अजून 12 मीटर (40 फूट) खोल शाफ्टमध्ये आणखी शवपेट्या सापडल्या. पर्यटक आणि पुरातन वास्तू मंत्री खालेद अल-अणानी यांनी जाजोरच्या 4,700 वर्षांच्या पिरामिड जवळ सांगितले की, 'आजच्या शोधाचा अंत नाही, मी त्यास मोठ्या शोधाची सुरुवात मानतो,' मंत्री पुढे म्हणाले, सुमारे 2500 वर्षांपूर्वीच्या सीलबंद शवपेट्या प्राचीन इजिप्तच्या उत्तरार्धातील सहाव्या किंवा सातव्या शतकातील आहेत. अलिकडच्या वर्षांत साककारामधील उत्खननात पुरातन वस्तू तसेच साप, पक्षी, स्कारब बीटल आणि इतर प्राणी सापडले आहेत.
लवकरच या सर्व शवपेट्या उघडल्या जातील व त्या ग्रँड इजिप्शियन संग्रहालयात (जीईएम) नेण्यात येतील. इजिप्तला अशी आशा आहे की अलिकडच्या वर्षांत लागलेल्या या पुरातत्व शोधामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल.