स्फोट I प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

चीनमधील एका केमिकल प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर येत आहे. या स्फोटात एकूण 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. उत्तर चीनमधील झांगजियाको हा शहरात ही घटना घडली असून बचाव कार्य सुरु आहे.

जखमींना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची नेमकी परिस्थिती कशी आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. या भीषण स्फोटात 38 ट्रक्स आणि 12 कार्स जळल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.