जॉनी डेप आणि अंबर हर्ड यांच्या बदनामीचा खटला नुकताच संपला. फेअरफॅक्स, व्हर्जिनिया येथे सहा आठवड्यांची ट्रायल पार पडली आणि शेवटी डेपने 15 दशलक्ष डॉलर्सचा हा खटला जिंकला. जगभरातील नेटिझन्स डेपचे पुनरागमन पाहण्यास उत्सुक होते. दरम्यान, जॉनीने त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले कारण त्याने TikTok वर पदार्पण केले आहे आणि टिक टाॅक या  सोशल प्लॅटफॉर्मवर त्याची पहिली पोस्ट देखील त्याने शेअर केली आहे. पहिल्या TikTok पोस्टमध्ये, अभिनेत्याने चाहत्यांनी केलेल्या समर्थनाबद्दल आभार मानले. “पुढे जाण्याच्या इच्छेवर जोर दिला”.