4 जून रोजी बांग्लादेशातील चितगाव येथे एका कंटेनर डेपोमध्ये भीषण आग लागली. वृत्तानुसार, या भीषण दुर्घटनेत ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीत 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. वृत्तानुसार, पोलिस अधिकारी नुरुल आलम यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की रासायनिक प्रक्रीयेमुळे आग लागली. स्फोटानंतर आग पसरल्याचे स्थानिक मीडिया रिपोर्ट्सने सुचवले आहे