Zomato Launches Large Order Fleet Food Orders: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) ने मंगळवारी मोठा ऑर्डर फ्लीट लॉन्च केला आहे. या फ्लीटद्वारे, ग्राहक आता थेट Zomato वरून एकावेळी 50 लोकांसाठी जेवण ऑर्डर करू शकतात. पार्टी, वाढदिवस आणि इतर छोट्या कार्यक्रमांच्या ऑर्डर्स मिळवून कंपनी या सेवेद्वारे आपला बाजारातील हिस्सा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. झोमॅटोचे सीईओ आणि सह-संस्थापक दीपंदर गोयल यांनी X वर सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, ते सर्व-इलेक्ट्रिक फ्लीट असेल. यामध्ये वाहनचालक मोठ्या ऑर्डर सहज घेऊन जाऊ शकतात. यापूर्वी अनेक नियमित वितरण भागीदारांद्वारे अशा ऑर्डर्स दिल्या जात होत्या.
गोयल यांच्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आज आम्ही भारतातील पहिल्या मोठ्या ऑर्डर फ्लीटची ओळख करून देण्यासाठी उत्सुक आहोत, जे तुमच्या सर्व मोठ्या (ग्रुप/पार्टी/इव्हेंट) ऑर्डर्स सुलभतेने हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हा पूर्णपणे इलेक्ट्रिक फ्लीट आहे, विशेषत: 50 लोकांच्या मेळाव्यासाठी ऑर्डर करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. (हेही वाचा - Flipkart Super Cooling Days Sale: कूलिंग होम अप्लायन्सवर मिळणार बंपर डिस्काउंट; 'या' दिवशी सुरू होणार फ्लिपकार्ट सेल)
Today, we are excited to introduce India's first large order fleet, designed to handle all your large (group/party/event) orders with ease. This is an all electric fleet, designed specifically to serve orders for a gathering of upto 50 people. pic.twitter.com/RCH6v0kxfn
— Deepinder Goyal (@deepigoyal) April 16, 2024
गोयल यांनी पुढे सांगितलं की, याआधी अशा मोठ्या ऑर्डर्स अनेक फ्लीट डिलिव्हरी भागीदारांद्वारे पूर्ण केल्या गेल्या होत्या. हे आमच्या ग्राहकांच्या अनुभवाशी सुसंगत नव्हते. या वाहनांच्या माध्यमातून सर्व समस्या सोडविल्या जातील. Zomato आपल्या ताफ्यात आणखी अनेक महत्त्वाचे बदल करणार आहे. यामध्ये कूलिंग कंपार्टमेंट्स आणि हॉट बॉक्सेस यांसारख्या बदलांचा समावेश आहे.