व्हॉट्सअॅप स्टेटस सेव्ह करण्याची एक नवी ट्रीक, स्क्रीनशॉट न घेता करु शकता सेव्ह
WhatsApp Notifications | (Photo credit: archived, edited, symbolic images)

व्हॉट्सअॅपच्या वाढत जाणा-या वापराबरोबरच व्हॉट्सअॅप स्टेटस(Whatsapp Status) ठेवण्यास फॅडही दिवसेंदिवस वाढत चाललय. एखाद्या लाइव्ह अपडेटप्रमाणे हे स्टेटस बदलतो. अशावेळी अनेकदा आपल्याला दुस-यांचे स्टेटस फार आवडते. अशा वेळी ते स्टेटस आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर आणण्यासाठी आपण ब-याचदा त्या स्टेटसचा स्क्रीनशॉट काढण्याचा सोपा पर्याय निवडतो. मात्र मग त्यात आपण फोटो कापणे, त्याला Effect देणे अशी बरीच रंगरंगोटीची काम करतो, ज्यात खूप वेळही जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा एका अॅपबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने तुम्ही स्क्रीनशॉट न काढता त्वरित एखाद्याचे स्टेसस कॉपी करु शकता.

त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल:

गुगल प्ले (Google Play store) स्टोअवरुन स्टेट्स सेव्हर अॅप डाउनलोड करा

व्हॉट्सअॅप च्या स्टेटस पेजवर जा

युजरनेमवर टॅप करा

पुन्हा स्टेट्स सेव्हर अॅप ओपन करा

अॅप स्टेट्सच्या डिस्प्लेला स्कॅन करणार

त्यानंतर व्हिडिओ आणि फोटो यांचे पर्याय दिसतील

आपल्याला हवा असलेला पर्याय निवडा

अॅप स्टेट्सच्या बाजूला तुम्हाला डाउनलोडचा पर्याय दिसेल

डाउनलोड पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाइलवर स्टेट्स सेव्ह होईल

थर्ड पार्टी अॅपशिवाय तुम्ही स्टेट्स असे डाउनलोड करा

तुमच्या फोनमधील फाइल मॅनेजर सुरू करा

फोनच्या इंटर्नल स्टोरेजमध्ये जा आणि सेटिंग्जवर क्लिक करा

शो हिडन फाइल्सच्या पर्यायाला एनेबल करा

इंटर्नल स्टोरेजमध्ये व्हॉट्स अॅप फोल्डरमध्ये जा

फोल्डरमध्ये मीडिया पर्यायावर क्लिक करा

फोल्डरमध्ये Statuses पर्याय मिळेल

इथे तुम्हाला व्हॉट्स अॅप स्टेट्स मिळेल

Mother's Day 2019 Wishes and Messages: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा मदर्स डे!

काय वाटला आमचा सुपर फंडा. ह्यामुळे स्क्रीनशॉट न काढता तुम्ही अगदी सहजपणे व्हॉट्सअॅप स्टेटस सेव्ह करु शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला आवडलेले एखाद्याचे व्हिडिओही तुम्ही सेव्ह करु शकता.