Diwali with Mi Sale (Photo Credits: Xiaomi)

सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही ठिकाणी फेस्टीव्ह सीजन चालू आहे. दुकानात सेलचे बोर्ड लावलेले दिसतात, तर अनेक ऑनलाईन कंपन्यांनी भरमसाट डिस्काऊंट जाहीर केला आहे. अशा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाओमी मोबाइल कंपनीनेदेखील कालपासून दिवाळी सेलचे, ‘Diwali with Mi'चे आयोजन केले आहे. शाओमीचा हा सेल त्यांच्या वेबसाईटवर चालू आहे. या सेलचे वैशिष्ट्य म्हणजे या सेलमध्ये दररोज एक रुपयांचा फ्लॅश सेल असणार आहे. म्हणजेच या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनसह अनेक उत्पादने फक्त 1 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

या सेलची सुरुवात संध्याकाळी 4 वाजल्यापासून होत आहे. सेलच्या पहिल्या दिवशी मोठ्या डीलच्या स्वरुपात शाओमीचा Poco F1 स्मार्टफोन आणि 35 सिक्युरिटी कॅमेरा 1 रुपयामध्ये खरेदी करण्याची संधी ग्राहकांना देण्यात आली होती. मात्र सेलला सुरूवात होताच शाओमी इंडियाचे संकेतस्थळ क्रॅश झाले. जवळपास अर्धातास वेबसाइट डाऊन झाली होती आणि त्यानंतर ‘Nope, No Carrots here’असा संदेश दिसत होता.

कालपासून सुरू झालेला हा सेल 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. या सेलचं सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यामध्ये दररोज एक रुपयाच्या फ्लॅशसेल. मात्र आज या सेलमध्ये पोको एफ 1 हा फोन उपलब्ध नसेल, त्याऐवजी रेडमी नोट 5 प्रो हा 14 हजार 999 रुपयांचा स्मार्टफोन आणि 799 रुपये किंमतीचे एमआय कॉम्पॅक्ट ब्ल्यूटुथ ऑडिओ स्पिकर-2 अवघ्या एक रुपयात उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सेलच्या अखेरच्या दिवशी ग्राहकांना Mi A2 हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी असेल.

                                                                        (Photo Credits: Xiaomi)

शाओमीने फ्लॅश सेल व्यतिरिक्त Small=Big या नावानेही ऑफर आणली असून यामध्ये दर्जेदार उपकरणे कमी किंमतीत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. या ऑफरमध्ये तुम्ही रेडमी 6A आणि 10000 mAh पावरबँक या दोन्ही गोष्टी अवघ्या 699 रुपयांत खरेदी करु शकतात.