Xiaomi Browser Banned In India: केंद्र सरकार कडून Xiaomi स्मार्टफोनच्या ब्राऊजर वर बंदी
Redmi Note 9 Pro Max (Photo Credits: Xiaomi India)

मोदी सरकारने पुन्हा एकदा चायनीज अ‍ॅप विरूद्ध आपली कारवाई सुरू केली आहे. दरम्यान चीनी कंपनी Xiaomi द्वारा Mi Browser 'Action Mi Browser Pro - Video Download, Free Fast & Secure' वर आता बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या बॅनमुळे मोबाईलवर प्रभाव पडणार नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान Forbes रिपोर्टनुसार, हॅन्डसेट मेकर्स युजर्सच्या प्रायव्हेट वेब आणि फोन युजेस डाटा घेत असल्याचं म्हटलं आहे. , Xiaomi's Mi Community app वर यापूर्वीच भारत सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्स नुसार, भारतामध्ये Xiaomi स्मार्टफोन कंपनीचे सुमारे 10 कोटी ग्राहक आहे. लवकरच कंपनीकडून भारत सरकारने केलेल्या या कारवाईबाबत मंत्रालयासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. Xiaomi च्या माहितीनुसार, त्यांच्याकडून लोकल डेटा प्रोटेक्शन सह ट्राई सोबत सार्‍या गाईडलाईन्सचे पालन केले जाते.

मोदी सरकरने 29 जून दिवशी सुमारे 59 चीनी अ‍ॅप बॅन केले आहेत. त्यानंतर 27 जुलैला 47 अन्य त्याचे क्लोन अ‍ॅप्सदेखील बॅन केले आहेत. यामध्ये हॅलो, शेअ‍र चॅट, टिकटॉक, कॅम स्कॅनर अशा अप्सचा समावेश होता. या सार्‍यांचे क्लोन अ‍ॅप म्हणजे हॅलो लाईट, टिकटॉक लाईट देखील बंद करण्यात आले आहेत.