WhatsApp हे एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. याची वाढती लोकप्रियता आणि युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन WhatsApp नवनवे फिचर्स सादर करत असतं. पण काही WhatsApp युजर्सला नव वर्षात WhatsApp वापरता येणार नाही. 31 डिसेंबर 2018 नंतर WhatsApp काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर सपोर्ट करणार नाही. त्यामुळे या विशिष्ट ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोन्सवर WhatsApp चालणार नाही.
Nokia च्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टम वापरणारे युजर्स आपल्या मोबाईलमध्ये WhatsApp वापरु शकणार नाहीत. Nokia S40 ही ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या फोनमध्ये 31 डिसेंबर 2018 पासून WhatsApp चालणार नाही. याचे कारण म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टमवर WhatsApp चालत नसल्यामुळे मेसेजिंग अॅप या प्लॅटफॉर्मसाठी फिचर डेव्हलप करणार नाही.
याशिवाय Android 2.3.7 आणि या जुन्या व्हर्जनसोबत iPhone iOS7 आणि याने जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर 1 फेब्रुवारी 2020 नंतर WhatsApp काम करणार नाही. मोबाईलच्या या ऑपरेटिंग सिस्टमवर प्लॅटफॉर्मसाठी WhatsApp डेव्हलप करणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 साठी WhatsApp 31 डिसेंबर 2017 नंतर सपोर्ट करणे बंद केले होते.