WhatsApp वर युजर्सला आता मिळणार Telegram सारखे अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स
व्हॉट्सअॅप स्टिकर्स (Photo Credits: Whatsapp Blog)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे जगातील सर्वाधिक मेसेजिंगसाठी वापरले जाणारे अ‍ॅप आहे. गेल्या काही दिवसांपासून टेलिग्रामला (Telegram) व्हॉट्सअ‍ॅप टक्कर देत आहे. याच दरम्यान आता व्हॉट्सअ‍ॅपने सुद्धा टेलिग्राम सारखे अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स (Animated Stickers) आणले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप मध्ये अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स बीटा वर्जन v2.20.294.7 मध्ये स्पॉट करण्यात आले होते. परंतु पुढील वर्जन v2.20.194.9 मधून व्हॉट्सअ‍ॅपने काढून टाकले होते. आता कंपनीने हे स्टिकर्स सर्व युजर्ससाठी रोलआउट केले आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन याबाबतची घोषणा केली आहे. कंपनीने अ‍ॅन्ड्रॉइड आणि iOS या दोन्ही वर्जनसाठी हे अपडेट उपलब्ध करुन दिले आहे.

जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अ‍ॅनिमेटेड स्टिकर्सचे ऑप्शन हवे असल्यास प्रथम अपडेट करा. अ‍ॅन्ड्रॉइड युजर्सला v2.20194.16 आणि iOS युजर्ससाठी v2.20.70 वर्जनमध्ये अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स मिळणार आहे. यासाठी युजर्सला Play Store मधून व्हॉट्सअ‍ॅपचे अपडेट करावे लागणार आहे.(WhatsApp वरील अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स ते QR कोड्स सारख्या अन्य दमदार फिचर्स बाबत अधिक जाणून घ्या)

नवे अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स वापरण्यासाठी Emoji Icon वर क्लिक करा. त्यानंतर (+) या आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर स्टीकर स्टोर सुरु होईल. तेथून युजर्सला अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स डाऊनलोड करता येणार आहेत. टेलिग्राम मध्ये हे फिचर आधीपासूनच दिलेले आहे. हे अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स डेस्कटॉप वर्जनसाठी डाऊनलोड करता येणार नाही आहेत.व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वीच डेस्कटॉपसाठी डार्क मोड उपलब्ध करुन दिले आहे. आता हे फिचर आल्यानंतर युजर्सला डार्क मोडचा सहज वापर करता येणार आहे.