व्हॉट्स अप हा जगातील सर्वाधिक वापरण्यात येणारा मेसेंजर अपलिकेशन आहे. सोशलव मिडीयाच्या या डिजिटल जगात व्हॉट्सअप वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. मेसेज, फोटो, व्हॉईस नोट, पाठवण्यासाठी वा व्हॉट्सअप कॉल, व्हिडीओ कॉल अशा विविध गोष्टींकरीता व्हॉट्स अपचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप हे सर्वाधिक नवनवीन अपडेट घेवून येणार मेसिंजर अपलिकेशन आहे. कायमचं अनोखे फिचर्स आपल्या वापरकर्त्यांसाठी घेवून येतो. तरी तुम्ही देखील व्हॉट्सअप वापरकर्ते असाल तर त्याबाबत नव्याने काही माहिती देण्याची गरजचं नाही. पण गेल्या काही दिवसांपासून तुमचं व्हॉट्सअप स्लो चालतयं का किंवा व्हॉट्सअप वापरायला जरा अडचण येतेय का तर हो असं होवूचं शकत. तुमचं व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं असल्यास व्हॉट्सअॅप स्लो होण्याची शक्यता असते. पण व्हॉट्सअप स्टोरेज फुल होण म्हणजे काय आणि फुल झालेलं स्टोरेज तुम्ही कसं रिकामं करायचं. याच बाबत काही महत्वपूर्ण टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.
बर्याच वेळा तुम्ही तुमच्या सेटिंग्जनुसार वाय-फाय किंवा नेटवर्कवर असता तेव्हा WhatsApp स्टोरेज फुल होऊन जाते आणि डिव्हाइसचे स्टोरेज वापरते. त्यानंतर WhatsApp तुम्हाला स्टोरेज फ्री करण्यास सांगतो. WhatsApp मध्ये एक बिल्ट इन स्टोरेज टूल आहे, ज्यामुळे तुम्ही किती स्टोरेज वापरत आहात आणि कोणत्या फाइल्स किती स्टोरेज घेत आहेत हे शोधू शकता. तुमच्या मोबाईल वरील WhatsApp स्टोरेज कसे फ्रि करण्साठी म्हणजेचं नको तो डेटा डिलीट करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टीप्स देणार आहोत.(हे ही वाचा:- WhatsApp Update: आता कुठल्याही भाषेत पाठवा व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉट्सअॅप कडून नवा फिचर लॉंच)
जाणून घेवूया व्हॉट्सअप स्टोरेज फ्री करण्यासाठी काही खास टीप्स:-
- WhatsApp सुरु करा.
- चॅट्स टॅबवर टॅप करा.
- त्यानंतर मोअर ऑप्शन्सवर क्लिक करुन सेटिंगमध्ये नेव्हिगेट करा.
- नंतर स्टोरेज आणि डेटावर टॅप करा आणि मॅनेज स्टोरेज पर्याय निवडा
- आता टॉपवर तुम्हाला फॉरवर्ड केलेले मेसेजेस दिसतील.
- यानंतर तुम्हाला ५ एमबीपेक्षा मोठ्या फाईलचा पर्याय दिसेल.
- आता तुम्ही एक-एक करून कोणताही फाईल पर्याय निवडू शकता.
- निवडलेल्या फाईल्स तुम्ही लगेच डिलीट करु शकता.
- अॅपच्या वरच्या उजव्या कोपर्यात दिसणार्या डिलीट आयकॉनवर टॅप करा.
- तसेच सर्च फीचरचा वापर करून तुम्ही चॅटमधून आयटम डिलीट करु शकता.