(WhatsApp: Photo Credits: Pixabay)

गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा आणि अफवांमध्येच अडकलेले WhatsApp चे Dark Mode फिचर लवकरच येण्याच्या तयारीत आहे. Whatsapp तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यात आता Dark Mode फिचर येत असल्या कारणाने अनेक युजर्स त्याची आतुरतेने वाट पाहात आहे. त्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. WABetaInfo वर शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, डार्क फिचर मोड लवकरच यूजर्सच्या भेटीला येत आहे. मात्र यात सर्वात महत्त्वाची बातमी या फिचरचा लाभ फक्त iOS 13 यूजर्सला घेता येणार आहे. या बातमीमुळे या फिचरच्या प्रतिक्षेत असलेल्या अन्य यूजर्सची निराशा झाली आहे.

WABetaInfo ने शेअर केलेल्या फोटोमध्ये या अॅपच्या मागे पुर्णपणे काळा रंग दिसत आहे. तर त्यावर लिहिलेले पांढ-या रंगात दिसत आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात येत आहे की, सध्या केवळ आयफोन यूजर्सला ही सेवा उपलब्ध होणार आहे. मात्र त्यानंतर लवकरच ही अॅनड्रॉईड युजर्सला सुद्धा उपलब्ध होणार आहे.

WhatsApp वर Dark Mode कसे सुरु कराल? जाणून घ्या

WABetaInfo ने असेही सांगितले की, iOS 13 वापरणा-या यूजर्सला त्यांच्या आयफोनमध्ये निळा आणि करड्या रंगाचे पर्याय उपलब्ध केले आहेत. यावरील तांत्रिक काम अंतिम टप्प्यात असून लवकरच फिचर आणले जाईल असे सांगण्यात येत आहे.

 WhatsApp वर डार्कमोड (Dark Mode) बाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. तर डार्क मोड म्हणजे एक प्रकारचे ऑल ब्लॅक थीम होय. Android 10 वर्जनमध्ये डार्कमोड देण्यात आले आहे. त्याचसोबत ट्वीटर, मेसेंजर आणि सोशल मीडियावरील काही अॅपसाठी डार्क मोड युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.