Vivo Z1 Pro Sale: आज दुपारी 12 वाजता सुरु होणार Vivo Z1 Pro चा सेल; जाणून घ्या काय आहे फोनची किंमत आणि फिचर्स
Vivo Z1 Pro Smartphone (Photo Credits: Twitter)

चायनीज स्मार्टफोन कंपनी वीवो चा गेमिंग सेंट्रिक स्मार्टफोन Vivo Z1 Pro चा आज दुसरा सेल आहे. 11 जुलै रोजी या स्मार्टफोनचा सेल पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सेलला चांगला प्रतिसाद मिळाल्याने याच महिन्यात दुसरा सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart, Vivo.com वर हा सेल सुरु होईल.

भारतात हा फोन याच महिन्यात लॉन्च करण्यात आला. गेमर्सवर लक्ष केंद्रीत करुन कंपनीने हा फोन तयार केला आहे. पंच होल डिस्प्ले आणि Qualcomm च्या Snapdragon 712 SoC सह हा फोन लॉन्च करण्यात आला. वीवोच्या या स्मार्टफोनमुळे Redmi Note 7 Pro, Samsung Galaxy M40 आणि Realme 3 Pro या स्मार्टफोन्सना चांगलीच टक्कर मिळत आहे.

Vivo Z1 Pro ची किंमत:

Vivo Z1 Pro हा स्मार्टफोन कंपनीने तीन वेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे वेस वेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. याची किंमत 14,990 रुपये आहे. यासोबतच 6GB रॅम और 64GB स्टोरेज असलेले वेरिएंट 16,990 रुपयांना उपलब्ध आहे. तर हाय एंड वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला फोन 17,990 रुपयांना खरेदी करता येईल. कंपनीचा हा स्मार्टफोन मिरर ब्लॅक, सोनिक ब्लू आणि सोनिक ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.

डिस्काऊंट:

Vivo Z1 Pro या स्मार्टफोनच्या फ्लॅश सेल ऑफरमध्ये ICICI बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यास तुम्हाला 750 रुपयांचा इस्टंन्ट डिस्काऊंट मिळेल. याशिवाय रिलायन्स जिओ युजर्सला 6000 रुपयांचा बंडल्ड डेटा देखील ऑफर केला जात आहे.

फिचर्स:

Vivo Z1 Pro मध्ये 6.53 इंचाचा एलसीडी डिस्प्ले आणि स्मार्टफोनचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 इतका आहे. तसंच फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोन Snapdragon 712 SoC सह Adreno 616 GPU आहे. यात Snapdragon X15 LTE मॉडेम आहे. फोन 30fps वर 4K video ला सपोर्ट करतो. वीवो ने गेमिंगच्या सुखद अनुभवासाठी यात डेडिकेटिड गेमिंग मोड दिला आहे. फोनचा स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपर रिअर कॅमेरा सेटअप आहे यातील पहिला सेंसर 16 मेगापिक्सलचा तर दुसरा सेंसर 8 मेगापिक्सल अल्ट्रा व्हाईड कॅमेरा आणि तिसरा डेप्थ सेंसर 2 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 9 पाय या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि हा स्मार्टफोन 18W fast फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे.