Twitter (Photo Credits-File Image)

ट्विटर (Twiiter)  या जगभरात लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग साईट्सच्या युजर्ससाठी मोठी बातमी आहे. नव्या मीडीया रीपोर्ट्सनुसार, मागील सहा महिन्यांपासून साईन इन न केलेले अकाऊंट्स आता लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अ‍ॅक्टीव्ह नसलेल्या युजर्सना आता ईमेलवरून माहिती देण्यास सुरूवात झाली आहे. आता युजर्सना 11 डिसेंबर पर्यंत साईन इन न केल्यास अकाऊंट बंद केले जाईल असे सांगण्यात आले आहे. बंद केलेल्या अकाऊंटचे युजर नेम आता दुसर्‍यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. इथे पहा ट्विटरच्या पॉलिसी.  

युजर्सना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याकडे आमचा भर आहे असे सांगत त्यांनी इनअ‍ॅक्टिव्ह युजर अकाऊंट बंद करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आता ट्वीटरवरील विश्वास अधिक वाढेल असेही ट्वीटर कडून सांगण्यात आले आहे. अद्याप त्याच्या तारखेची माहिती देण्यात आली नसली तरीही डिसेंबर 2019 पर्यंत हा निर्णय घेतला जाणार आहे. पुढील काही महिने त्याच्यासाठी वेळ लागणार आहे.

मागील सहा महिन्यांपासून लॉग इन न केलेल्या अनेक अकाऊंट्सची माहिती मिळाली आहे. अकाऊंट बंद करण्यापूर्वी अशा युजर्सना मेल पाठवून त्याची माहिती देण्यात येणार आहे. रिट्वीट' आणि 'मेन्शन्स' फिचर्स देखील अपडेट केली जाणार आहेत.