फेस्टीव सेलमध्ये कमी पैशात अधिक शॉपिंग करण्यासाठी '7' स्मार्ट टिप्स !
शॉपिंग (Photo Credits : Pixabay)

ई कॉमर्स वेबसाईटवर फेस्टिव सीजन सेल सुरु झाले आहेत. अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी ग्रेट इंडियन फेस्टिवलची सुरुवात झाली असून काही सेल्स आजपासून सुरु होतील. या सेलचा फायदा तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. त्याचबरोबर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजची सुरुवात झाली आहे. फेस्टीव सेलमध्ये शॉपिंग करताना कमी पैशात अधिक शॉपिंग करण्यासाठी या टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...

किंमतीची तुलना करा

तुमच्या आवडीचे प्रॉडक्स विकणाऱ्या एक नाही तर अनेक वेबसाईट्स आहेत. अशावेळी एकाच वेबसाईवरुन शॉपिंग करण्याअगोदर वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून प्रॉडक्टच्या किंमती तपासून त्याची तुलना करुन पाहा. त्यानंतर शॉपिंग करा.

बँक ऑफर्स

यंदा अॅमेझॉनने SBI सोबत करार केला असून त्याअंतर्गत 10% ची सूट मिळत आहे. तर फ्लिपकार्टवर HDFC कार्डने पेमेंट केल्यावर 10% डिस्काऊंट मिळत आहे. कोणतेही प्रॉड्क्स खरेदी करण्यापूर्वी बँक ऑफर्स नीट वाचून घ्या.

वॉलेट आणि कॅशबॅक ऑफर्स

बँकेतून काही ऑफर मिळत नसल्यास तुमचे ई-वॉलेट तुम्हाला कॅशबॅक मिळवून देईल. अनेक ई वॉलेट्सवर पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक उपलब्ध आहेत. पेटीएम मॉलवर पेटीएम वॉलेटवरुन पेमेंट केल्यानंतर त्याचबरोबर अॅमेझॉन वॉलेट म्हणजेच अॅमेझॉन पेमेंटवरुन पेमेंट केल्यावर, फ्लिपकार्ट फोनवरुन पेमेंट केल्यावर आणि स्नॅपडिल फ्रिचार्जवरुन पेमेंट केल्यावर कॅशबॅकचा पर्याय उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी जुना फोन दिल्यास युजर्सला एक्सचेंज ऑफर मिळत आहे. अॅमेझॉनवर Note 9 वर 5,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. फ्लिपकार्ट Zenfone 5Z वर 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे.

डील टायमिंग्स

ई कॉमर्स वेबसाईट्सवर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या डील्स उपलब्ध आहेत. अशावेळी तुमच्या आवडत्या प्रॉडक्ट्सवर कधी आणि केव्हा सेल सुरु होणार आहे, याकडे लक्ष ठेवा.

फ्लॅश सेल आणि इंस्टंट डिस्काऊंट

बँक ऑफर्ससह कंपन्या आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन्स कमी किंमतीत उपलब्ध करतात. उदा. Realme 2 Pro किंवा Realme C1 वर बिग बिलियन डे सेलमध्ये HDFC बँक कार्ड आणि PhonePe वरुन पेमेंट केल्यास इंस्टंट डिस्काऊंट मिळत आहे.

लवकर चेकआऊट

फ्लॅशसेलमध्ये कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी युजर्सला आपले डिटेल्स आधीच साईटवर सेव्ह करावे लागतील. युजर्सला फ्लॅश सेलमध्ये प्रॉडक्ट खरेदी केल्यावर फक्त 30-45 सेकंदाचा वेळ मिळतो. अशावेळी तुमचे इंटरनेट कनेक्शन चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही लवकर चेकआऊट करु शकाल.