Tata Play (फोटो सौजन्य - Instagram)

देशातील लोकप्रिय डीटीएच सेवेपैकी एक असणारे टाटा स्काय (Tata Sky) आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीची विशेष काळजी घेत असते. गेल्या अनेक वर्षांमध्ये कंपनीने अनेक सेवा देखील दिल्या आहेत, ज्यामुळे वापरकर्तेही खूप खूश आहेत. त्याच वेळी, टाटा स्काय आता टाटा प्ले (Tata Play) म्हणून ओळखले जाईल कारण कंपनीने त्याचे (Netflix Subscription) नाव बदलून टाटा प्ले (Tata Play) केले आहे. 15 वर्षांनंतर बदलासह, वापरकर्त्यांना अनेक विशेष सुविधा (Tata Sky DTH) प्रदान केल्या जातील. टाटा प्ले वापरकर्त्यांना आता नेटफ्लिक्समध्ये देखील प्रवेश मिळणार आहे.

Tata Sky ब्रॉडबँडचे नाव बदलले -

टाटा स्काय आता टाटा प्ले म्हणून ओळखले जाईल. यासोबतचं टाटा समूहाने आपल्या ब्रॉडबँड सेवेचे रीब्रँडिंग केले आहे. टाटा स्काय ब्रॉडबँडचे नाव आता बदलून Tata Play Fiber करण्यात आले आहे. (वाचा - Instagram वर आवडत्या Creator चा कंटेंट पाहण्यासाठी भरावे लागू शकतात पैसे; लवकरच येणार Subscription फिचर)

टाटा प्लेसोबत उपलब्ध असेल नेटफ्लिक्स -

जर तुम्ही टाटा स्काय डीटीएच म्हणजेच टाटा प्ले वापरत असाल तर तुम्हाला नेटफ्लिक्समध्येही प्रवेश मिळेल. फक्त तेच वापरकर्ते Netflix मध्ये प्रवेश मिळवू शकतील जे, त्यांचा सेट टॉप बॉक्स Binge+ वर अपग्रेड करतील. Netflix सोबत, वापरकर्त्यांना Binge+ मध्ये Google Play Store आणि Google Chromecast सारख्या वैशिष्ट्यांमध्ये देखील प्रवेश मिळेल. Tata Play DTH ला एकूण 90 बंडलमध्ये प्रवेश मिळेल. तथापि, त्यांची नावे अद्याप उघड केलेली नाहीत. या बंडलमध्ये, तुम्हाला नियमित टीव्ही चॅनेलसह Binge Combo पॅकमध्ये प्रवेश मिळेल. Tata Play DTH ची ही सेवा फक्त Binge + सेट टॉप बॉक्सद्वारे अॅक्सेस केली जाऊ शकते, ज्याची किंमत 2,499 रुपये आहे.