गूगलने(Google) आज (16 ऑगस्ट) प्रसिद्ध कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान (Subhadra Kumari Chouhan) यांना 117 व्या जयंती निमित्त आपलं खास डूडल (Doodle) समर्पित केले आहे. सुभद्रा कुमारी चौहान यांची 'झांसी की रानी'(Jhansi ki Rani) ही कविता हिंदी साहित्यामध्ये विशेष गाजली आहे. दरम्यान आज गूगलच्या होम पेज वर झळकणार्या डूडल वर सुभद्रा कुमारी चौहान या साडी मध्ये पेन पेपर घेऊन बसल्या आहेत. त्यांच्या मागे राणी लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार होऊन दौडत असल्याचं चित्र आहे. तसेच इतर काही स्वातंत्र्यसेनानी देखील असल्याचं पहायला मिळत आहे.
सुभद्रा कुमारी चौहान यांनी हिंदी साहित्यामध्ये अनेक कविता शब्दबद्ध केल्या आहे. त्यापैकी झांसी की राणी विशेष गाजली. यामध्ये राणी लक्ष्मीबाईंचे वर्णन केले आहे.महिलांसोबत समाजात विविध स्तरावर केला जात असलेला दुजाभाव यावर मात करण्यासाठी, महिलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आवश्यक प्रेरणा देणार्या सुभद्रा कुमारी चौहान यांच्या कविता आहेत. नक्की वाचा: India Independence Day 2021 Google Doodle: 'भारताचा स्वातंत्र्यदिन' साजरा करत गुगलने बनवले डूडल.
सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1904 साली उत्तर प्रदेशात प्रयागराज मधील निहालपूर गावात झाला. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचे ठाकूर लक्ष्मण सिंह चौहान ऑफ खांडवा यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना 5 मुलं होती. पुढे त्या जबलपूरला स्थायिक झाल्या.
सुभद्रा आणि तिच्या पतीने पुढे महात्मा गांधींजींच्या असहकार चळवळी मध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांविरूद्ध सुरू केलेल्या चळवळीमध्ये तुरूंगात जाणारी ती पहिली महिला सत्याग्रही होती.1923 आणि 1942 मध्ये त्यांची रवानगी नागपूरच्या जेल मध्ये करण्यात आली होती. नागपूर वरून जबलपूरला जाताना एका रस्ते अपघातामध्ये 1948 मध्ये त्यांचे निधन झाले.