Super Pink Moon Update: येत्या 27 एप्रिलला आकाशात पाहायला 'सुपर पिंक मून' अद्भूत नजारा, आज येणार चंद्र पृथ्वीच्या जवळ
Super Blood Wolf Moon 2019 (Photo credits: Pixabay)

येत्या 27 एप्रिलला म्हणजे उद्या नभांगणात एक विलोभनीय नजारा पाहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सुपर पिंक मूनचे (Super Pink Moon) दृश्य पाहायला मिळणार आहे. हा या वर्षातील पहिला सुपरमून असेल. यावेळी चंद्र 10% तर पृथ्वी 30% तेजस्वी दिसेल. आज चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार आहे. खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ते 28 तीन दिवस चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल. हा सुपर पिंक मून गुलाबी रंगाचा दिसेल. या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर 3,58,615 किमी असेल असे सांगण्यात येत आहे.

27 एप्रिलनंतर 26 मे ला सुपरमून दिसणार आहे. यावेळी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर खूपच कमी होणार आहे. हा सुपरमून पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. मात्र दुर्बिणीत तुम्ही वेगवेगळे फिल्टर घालून त्याच्या रंगछटा तुम्ही पाहू शकता.हेदेखील वाचा- Eclipses of 2020: भारतीय खगोलप्रेमींसाठी आगामी वर्षभरात 6 ग्रहणं, सुपरमून, ब्ल्यू मून अनुभवता येणार; पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारी दिवशी!

सुपर पिंक मून म्हणजे चंद्र गुलाबाच्या फुलासारखा दिसतो. हे फूल वसंत ऋतूत नॉर्थ अमेरिकेत दिसतो. या सुपरमूनमध्ये चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के प्रकाशित दिसतो. पाश्चिमात्य देशात याला स्नो मून, स्ट्रोम मून आणि हंगर मून म्हणून संबोधले जाते. मागील वर्षी 7 एप्रिलमध्ये सुपरमून दिसला होता.

पिंक सुपरमून हे फक्त एक नाव आहे, त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. वास्तविक, अमेरिका आणि कॅनडामध्ये या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा (Phlox Subulata) नावाच्या फुलाचा बहर येतो, या फुलामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून म्हटले जाते. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार, साधारण 41 वर्षांपूर्वी 1979 मध्ये पहिला सुपरमून दिसला होता. यंदा मे महिन्यातही सुपरमून दिसणार आहे