Surya Grahan 2019 Sutak Time: 26 डिसेंबर दिवशी दिसणार्‍या सूर्यग्रहणाचा सुतक काळ, ग्रहण काळ काय?
Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

Kankanakruti Surya Grahan 2019 Date and Time:  2019 वर्षातील शेवटचं ग्रहण यंदा 26 डिसेंबर दिवशी आहे. सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती (Solar Eclipse) कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातील काही भागातून दिसणार असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. 'ग्रहण' या संकल्पनेविषयी समाजात अनेक समज- गैरसमज आहेत. वयोवृद्ध, नवजात बालकं आणि गरोदर स्त्रिया ग्रहणाच्या काळात विशेष काळजी घेतात.त्यामुळे ग्रहण जरी 26 डिसेंबर दिवशी असेल तरीही त्याचा सुतक काळ 25 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. यंदाच्या सूर्यग्रहणचा सुतक काळ 25 डिसेंबर दिवशी संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर ग्रहण 26 डिसेंबरला सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी संपणार आहे. भारतामध्ये सुतककाळाला विशेष महत्त्व आहे. या सुतक काळामध्ये धार्मिक गोष्टी टाळल्या जातात. Surya Grahan 2019: ग्रहणात गर्भवती महिलांनी कशी घ्यावी काळजी.

महाराष्ट्रात 80-84% सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकले जाणार आहे. 26 डिसेंबर रोजी मुंबईतून सकाळी 8 वाजून 04 मिनिटांनी सूर्यग्रहणाला सुरूवात होणार आहे. ग्रहणमध्य सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी होईल. यावेळेत जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. तर सूर्यग्रहण सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे. Surya Grahan 2019: वर्षाअखेरीच्या शेवटच्या सूर्यग्रहणाला 57 वर्षांनंतर जुळून आलाय 'हा' योग; वाचा सविस्तर.

भारतामध्ये कंकणाकृती कुठून दिसणार?

कंकणाकृती सूर्यग्रहणाची अवस्था दक्षिण भारतातील कोइम्बतूर,धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड , कन्नूर,करूर,कोझीकोडे,मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी,फाल्लकड, पायन्नूर,पोलची,पुडुकोटल,तिरूचीपल्ली,तिरूर

दरम्यान सूर्यग्रहण ही एक भौगालिक आणि नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे समज गैरसमज दूर सारून लोकांनी मोठ्या प्रमाणात सूर्यग्रहण पहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र थेट उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहणं हे डोळ्यांना अपायकारक ठरू शकतं त्यामुळे विशिष्ट काळजी घेऊन या दुर्मिळ योगाचा अनुभव घ्या.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )