मेरी सॉमरविल यांच्या सन्मानार्थ गुगलने तयार केले खास डूडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक
Google honours Mary Somerville with a doodle (Photo Credits: Screenshot/Google)

Mary Somerville Google Doodle: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलने आज एक खास डूडल बनवले आहे. तर स्कॉटिश वैज्ञानिक मेरी सॉमरविल (Mary Somerville) यांच्या सन्मानार्थ आजचे डूडल आहे. 2 फेब्रुवारी 1826 मध्ये ब्रिटेनची राष्ट्रीय वैज्ञानिक अॅकाडमीच्या रॉयल सोसायटी ऑफ लंडन द्वारे सॉमरविल यांचे प्रायोगित भौतिक पेपर वाचण्यात आले होते. सॉमरविल यांचा जन्म 26 डिसेंबर, 1790 रोजी स्कॉटलंड मधील जेडबर्ग येथे झाला. विनम्र आणि प्रतिष्ठित परिवारात जन्म घेतलेल्या सॉमरविल यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांच्या आईसोबत घराच्या आजूबाजूला काम करण्यास मदत केली.

सॉमरविल या विलियम जॉर्ज फेयरअॅक्स यांची मुलगी होती. तर वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचे वडील विदेशातून परतल्यावर सॉमरविल यांना बोर्डिंग स्कूल मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. जेव्हा इकॉनॉमिस्ट आणि फिलोसॉफर जॉन स्टुअर्ड मिल यांनी महिलांना अधिकार देण्यासाठी संसदेत एक मोठी याचिका दाखल केली. या याचिकेत सर्वात प्रथम सॉमरविल यांच्या हस्ताक्षराने लिहिलेले काही पेपर होते.(Spring Equinox 2019: Google ने Doodle साकारत केले वसंत ऋतूचे स्वागत)

सॉमरविल एक स्कॉटिश वैज्ञानिक लेखकसह खगोलशास्रात त्यांनी आपले मोठे योगदान दिले आहे. त्यांनी गणित आणि खगोल विज्ञान यांचा अभ्यास केला आणि कैरोलीन हर्शलच्या रुपात एकाच वेळी रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. गुगल डूडलच्या माध्यमातून मेरी सॉमरविल यांचे एक चित्र दाखवले असून त्यामधून त्या काहीतरी लिहित असल्याचे प्रतित होत आहे.