2019 मध्ये आपण चंद्राच्या अगदी जवळ पोहचलो हतो, मात्र शेवटच्या क्षणी पावले अडखळली आणि भारताची चंद्रयान-2 (Chandrayaan-3) मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. परंतु 2020 मध्ये भारत चंद्रयान -3 (Chandrayaan-3) लाँच करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
महत्वाचे म्हणजे त्यांच्यामते या मोहिमेला चंद्रयान-2 पेक्षा कमी खर्च येणार आहे. चंद्रयानमध्ये चंद्रावर फक्त एक ऑर्बिटर पाठविला गेला होता. चंद्रयान-2 मध्ये, लँडर आणि रोव्हरदेखील ऑर्बिटरसह पाठविले गेले होते. आता इस्रो (ISRO) चंद्रयान-3 मोहिमेची तयारी करत आहे.
एएनआय ट्वीट -
Indian Space Research Organisation Chief K Sivan: Government has approved Chandrayan-3, the project is ongoing. pic.twitter.com/KcJVQ1KHG7
— ANI (@ANI) January 1, 2020
याबाबत बोलताना इस्रो प्रमुख के. शिवन (K Sivan) म्हणाले की, 'चंद्रयान-3 प्रकल्प यावर्षी सुरू होईल. चंद्रयान-3 मोहिमेसाठी सरकारची परवानगी मिळाली आहे. चंद्रयान-3 ही मोहीम चंद्रयान-2 प्रमाणेच असेल. इस्रोकडून या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या मोहिमेत लँडर आणि रोव्हर देखील असतील.' इस्रोचा चंद्रयान-2 हा फार महात्वाकांक्षी प्रकल्प होता, केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याची बरीच चर्चा झाली होती. (हेही वाचा: Eclipses of 2020: भारतीय खगोलप्रेमींसाठी आगामी वर्षभरात 6 ग्रहणं, सुपरमून, ब्ल्यू मून अनुभवता येणार; पहिलं चंद्रग्रहण 10 जानेवारी दिवशी!)
इस्रोचे लँडर चंद्रच्या पृष्ठभागावर उतरविणे गरजेचे होते, मात्र तसे घडले नाही. या मोहिमेचा हा शेवटचा टप्पा क्रॅश लँडिंगमुळे यशस्वी होऊ शकला नाही. मात्र, ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत फिरत आहे आणि त्याचे कार्य योग्यरित्या करीत आहे. पुढील 7 वर्षांसाठी याचे काम चालणार आहे. दरम्यान, जानेवारी 2020 च्या तिसर्या आठवड्यापासून गगनयान अंतराळवीरांना प्रशिक्षण दिले जाईल. गगनयान मिशनसाठी 4 अंतराळवीरांची निवड झाली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील सल्लामसलत समिती स्थापन केली आहे. 2019 मध्ये भारताने गगनयान प्रकल्पात बरीच प्रगती केली आहे.