Chandra Grahan 2020: 10 जानेवारी दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण पण सुतक काळ नाही; जाणून घ्या कारण
Representational Image (Photo Credits: Pixabay)

Chandra Grahan 2020 Sutak Time: 2020 या नववर्षातील पहिलं चंद्रग्रहण यंदा 10 जानेवारी दिवशी दिसणार आहे. चंद्र ग्रहण यंदा 10 जानेवारीच्या रात्री पौर्णिमेपासून सुरू होणार आहे तर दुसर्‍या दिवशी 11 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. यंदा हे चंद्रग्रहण (Chandra Grahan) भारतामधूनही दिसणार आहे. हे चंद्रग्रहण छायाकल्प (Penumbral Lunar Eclipse) असल्याने त्याचे वेध पाळणं बंधनकारक नसेल. तसेच या काळात इतर ग्रहणांप्रमाणे मंदीरं बंद राहणार नाहीत. पंचागकर्त्यांच्या माहितीनुसार, ज्या चंद्रग्रहणामध्ये चंद्र पूर्णपणे झाकलेला नसेल, चंद्राची सावली पृथ्वी पडणार नसेल तर त्याचे वेध पाळण्याची शक्यता नसते.

आशिया खंडात भारताप्रमाणेच इतर देशांमध्येही छायाकल्प चंद्रग्रहण पाहता येणार आहे. या चंंद्रग्रहणाचा अद्भुत नजारा आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये दिसणार आहे.

चंद्रग्रहणाची वेळ काय?

ग्रहण सुरू कधी होणार

10 जानेवारी 2020 च्या रात्री 10 वाजून 39 मिनिटांनी सुरू होईल

ग्रहण संपणार कधी

11 जानेवारी 2020 दिवशी रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी संपणार आहे.

यंदा 10 जानेवारी 2020 दिवशीचे छायाकल्प चंद्रग्रहण 2020 यंदा 4 तास दिसणार आहे.

एरवी चंद्रग्रहणाच्या पूर्वी सुमारे 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो. मात्र 10 जानेवारीच्या चंद्रग्रहणामध्ये हा सूतक काळ नसेल. छायाकल्प चंद्रग्रहणाचा समावेश चंद्रग्रहणामध्ये समाविष्ट केला जात नाही. सूतक काळ नसल्याने मंदिरं बंद ठेवण्याची, पूजा - पाठ न करण्याचे नियम लागू नसतात. त्यामुळे सामान्य दिवसांप्रमाणेच चंद्रग्रहणाचा हा दिवसदेखील तुम्ही पाळू शकता. 10 जानेवारी दिवशी पौष पौर्णिमा आणि चंद्र ग्रहण एकाच दिवशी आले आहे.