सध्या जगात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असताना आज पृथ्वीजवळून Asteroid 1998 OR2 लघुग्रह (Asteroid)जाणार आहे. जगभरातील अनेक खगोलप्रेमींना या खगोलीय घटनेचं अप्रुप आणि उत्सुकता आहे. भारतीय वेळेनुसार आज (29 एप्रिल) दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी ही घटना अनुभवता येणार आहे. दरम्यान काही रिपोर्ट्सनुसार ही घटना पृथ्वीसाठी घातक असल्याचा दावा करत असली तरीही त्यामध्ये काही तथ्य नाही. सुमारे 3 किमी व्यासाचा हा लघुग्रह पृथ्वीपासून 6.2 मिलीयन किलोमीटर लांबून जाणार आहे. दरम्यान तुमच्याही मनात या घटनेबाबत उत्सुकता असेल तर त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग Virtual Telescope Projectच्या माध्यमातून ऑनलाईन पाहता येणार आहे.
पृथ्वीच्या आजूबाजूने अशी अनेक लघुग्रह येत-जात असतात. Asteroid 1998 OR2 याबाबत विशेष उत्सुकता आहे कारण हे थोडं आणि थोडं भीतीदायक आहे. मात्र NASA या अमेरिकन आंतरळ संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत चिंता किंवा भीती बाळगण्याचं कारण नाही. सध्या संशोधक त्याच्या प्रवासावर लक्ष ठेवून आहेत. सध्याचा त्याचा प्रकशित करण्यात आलेला एक फोटो तो जणू मास्क घालून आला आहे असं दाखवत आहे.
Asteroid 1998OR2 Live Streaming
Virtual Telescope Project कडून जगभरातील खगोलप्रेमींना या घटनेचं साक्षीदार होता येणार आहे. ढगाळ वातावरणामुळे ही घटना 18:30 UT म्हणजेच 12.00 AM IST पासून पाहता येईल. त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग होईल. ही घटना धोकादायक नाही. मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वी आणि चंद्रामध्ये असलेल्या अंतराच्या 16 पट लांबून हा लघुग्रह जाणार आहे. त्यामुळे त्याचा आपल्या जगाला काहीच धोका नसेल.