Samsung Launches The Sero Rotating Smart TV: सॅमसंगने आपल्या उत्पादनाची श्रेणी वाढविताना आपली 'द सेरो' (The Sero) रोटेटिंग टीव्ही (Rotating Smart TV) लाँच केली आहे. कंपनीने हा रोटेटिंग टीव्ही खासकरुन सोशल मीडिया जनरेशनसाठी विकसित केला आहे. 43 इंचाच्या स्क्रीन आकाराच्या सॅमसंग सेरोची किंमत 1,24,990 रुपये आहे. ग्राहक हा टीव्ही रिलायन्स डिजिटल स्टोअर वरून खरेदी करू शकतात. आपल्याला या टीव्हीमध्ये एक उत्कृष्ट QLED डिस्प्ले मिळेल. यात विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. जे AI च्या मदतीने 4k रेझोल्यूशनसारखी गुणवत्ता देते. हा टीव्ही रोटेटिंग मेकनिज्मसह येतो. आपण आपल्या गरजेनुसार टीव्ही आडव्या किंवा उभ्या दिशेने रोटेड करू शकता.
The Sero फिचर्स -
दमदार आवाजासाठी, या टीव्हीमध्ये 4.1 चॅनेलसह 60 वॅटचे स्पीकर देण्यात आले आहेत. टीव्हीबद्दलची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे आपण यात आपल्या फोन कन्टेंट ला मिरर करू शकता. यासाठी आपल्याला फक्त टीव्हीवर फोन टॅप करावा लागेल. रिमोट कंट्रोलद्वारे वापरकर्ते टीव्ही फिरवू शकतात. विशेष म्हणजे हा टीव्ही व्हॉईस कमांडलादेखील सपोर्ट करतो. टीव्हीला रोटेटींग किंवा व्हॉईस कमांड देण्यासाठी SmartThings App ची गरज लागते. (हेही वाचा - WhatsApp Shopping Button: भारतासह जगभरात उपलब्ध झाले व्हॉट्सअॅपवर नवीन शॉपिंग बटण; चॅटमधून कॅटलॉग पाहून थेट खरेदी करू शकाल प्रॉडक्ट )
दरम्यान, टीव्हीमधील आणखी फिचर्सविषयी बोलायचं झालं तर, यात आपल्याला अॅडॉप्टिव्ह पिक्चर, रिस्पॉन्सिव्ह यूआय आणि अॅक्टिव्ह व्हॉइस अॅम्प्लीफायर मिळेल. टीव्हीमध्ये एक खास ऑल-इन-वन स्टँड देण्यात आला आहे, जो 360 डिग्री फिरता येतो.
ग्राहकांना हा टीव्ही रिलायन्स डिजिटल स्टोअर वरून खरेदी करता येऊ शकतो. उत्सवाच्या हंगामात वापरकर्त्यांना भुरळ घालण्यासाठी कंपनी टीव्ही खरेदीवर 5 टक्के कॅशबॅकही देत आहे. वापरकर्ते हा सॅमसंग टीव्ही 1190 रुपयांच्या ईएमआयवरही खरेदी करू शकतात. एवढेचं नव्हे तर रिलायन्स डिजिटल टीव्ही खरेदीवर यूजर्सला AJIO आणि रिलायन्स ट्रेंडचे गिफ्ट वॉचसुद्धा देत आहे. ही ऑफर 16 नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध आहे. हा टीव्ही 10 वर्षांच्या स्क्रीन बर्न-इन वॉरंटीसह येतो.