सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 भारतात लॉन्च ; हे आहेत खास फिचर्स
सॅमसंग लोगो (Photo Credit: Facebook)

सॅमसंगने फ्लॅगशिप गॅलेक्सी टॅब एस4 भारतीय बाजारात लॉन्च केला. याची किंमत 57,900 रुपये आहे. हे नवे टू इन वन टॅबलेट आहे. गॅलेक्सी टॅब एस4 अतिशय स्लिम असून त्यात 10.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात सुपर एमोलेड आणि 10:10 स्क्रीन रेशो देण्यात आला आहे. यात 7,300 एमएएचची बॅटरी आहे. यात एकेजीने ट्यून केलेले चार स्पीकर्स आहेत.

सॅमसंग इंडियाचे जनरल मॅनेजर आदित्य बब्बर यांनी सांगितले की, "सॅमसंग डेक्स आणि एस पेनसोबत गॅलेक्सी टॅब एस4 डिझाईन करण्यात आले आहे. या एका टॅबलेटमध्ये कॅम्प्युटर इतकी कार्यक्षमता आहे. ड्युअल मोडमध्ये युजर्ससाठी एचडीएमआय अडेप्टरच्या माध्यमातून मोठ्या मॉनिटरवर कनेक्ट करु शकता."

यात असलेले एस पेनमुळे तुम्ही चित्र काढू शकता, नोट लिहू शकता, मेसेज देखील पाठवू शकता.