Samsung Galaxy Ring | Representational image (Photo Credits: pxhere)

नागरिकांना आरोग्याच्या संदर्भात विविध प्रकारची अद्ययावत माहिती देणारी स्मार्ट वॉच आता कालबाह्य होणार की काय? अस सावाल उपस्थित केला जातो आहे. त्याचे प्रमुख कार म्हणजे Samsung Galaxy Ring. जी पुढच्या वर्षभरात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी रिंग सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रामुख्याने तिच्या फीचर्सबद्दल. आपणही जाऊन घेऊ शकता या खास रिंगची फीचर्स. वृत्तसंस्था आयएनएसने याबाबत माहिती दिली आहे, या माहितीमध्ये म्हटले आहे की, आरोग्य वैशिष्ट्यांसह स्मार्ट घड्याळे सामान्य होत असताना, जग आता स्मार्ट रिंगकडे वाटचाल करत आहे. नॉईजने अलीकडेच भारतात आरोग्य वैशिष्ट्यांसह पहिली स्मार्ट रिंग लाँच केली आणि पुढील वर्षी सॅमसंग गॅलेक्सी रिंगसाठी तयारी करत असल्याने नागरिकांना आणखी खास वैशिष्ट्ये आणि पर्याय मिळेल.

स्मार्टवॉचप्रमाणेच, स्मार्ट रिंगचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अंगभूत सेन्सर्सद्वारे तपशीलवार शरीर आणि आरोग्य डेटा गोळा करण्याची क्षमता. जी कनेक्ट केलेल्या स्मार्टफोनवर पाहता येऊ शकते.

रिंगची अचूकता सुधारण्यासाठी वापरकर्त्याच्या बोटाच्या आकारानुसार त्यात बदलल केला जाऊ शकतो. ही रिंग बोटांमध्ये घट्ट बसल्याने अचूकता अधिक निश्चित होते. आणि चुका टाळल्या जातात.

दरम्यान, रिंगची वैशिष्ट्ये पाहिल्यास ती लॉन्च होण्यासाठी किमान 10 ते 12 महिने लागतील, ज्यामुळे उत्पादनाची लॉन्चीगची तारीख करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागू शकते. (हेही वाचा, What is Artificial Intelligence: आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे काय? त्याचा कुठे होतो वापर)

ट्िट

गॅलेक्सी रिंगला वैद्यकीय मंजुरी मिळाल्यानंतर ती 2024 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. द इलेकच्या अहवालाचा दाखला देत फिनान्शिअल एक्सप्रेसने म्हटले आहे की, रिंग लवकरात लवकर 2024 मध्ये लॉन्च होऊ शकते. “सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने सप्टेंबरमध्ये उत्पादनाचा विकास सुरू केला आणि पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत विकास पूर्ण केला तरीही, वैद्यकीय उपकरणाची मंजुरी मिळण्यासाठी अतिरिक्त 10 ते 12 महिने लागतील,” असे अहवालात म्हटले आहे.