Samsung Galaxy M52 5G आज भारतात होणार लॉन्च; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि फिचर्सबद्दल
Samsung Galaxy M52 5G (Photo Credits: Samsung)

साऊथ कोरियन स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंग (Samsung) आज आपला नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. गॅलेक्सी एम52 5जी (Galaxy M52 5G) असे या स्मार्टफोनचे नाव असून अधिकृत ट्विटर (Twitter) हँडलवरुन या डिव्हाईसबद्दल माहिती देण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होईल. त्यानंतर अॅमेझॉन (Amazon) वर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येईल.

Samsung Galaxy M52 5G या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+Super AMOLED डिस्प्ले 2400x1080 पिक्सल रिज्योल्यूशनसह देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. यात Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M52 5G (Photo Credits: Samsung)

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यात 64MP चा मेन कॅमेरा, 12MP चा सेकंडरी शूटर आणि 5MP चा मायक्रो स्नॅपर चा अंतर्भाव आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M52 5G (Photo Credits: Samsung)

Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 25W चार्गिंग सपोर्ट देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात GPS/ A-GPS, NFC, 5G, 4G LTE आणि USB Type-C port देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची किंमत पोलंडमध्ये PLN 1,749 म्हणजेच सुमारे 32,900 रुपये इतकी आहे. त्यामुळे भारतातही या मोबाईलची किंमत यानुसारच असेल, असा अंदाज आहे.