जर तुमचा सुद्धा 48 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा असणाऱ्या सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण गेल्या वर्षात भारतात लॉन्च झालेला या स्मार्टफोनच्या किंमतीत दुसऱ्यांच्या घट करण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम21 ची किंमत 1 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या दोन्ही वेरियंटच्या किंमती कमी झाल्या आहेत. तर जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमतीसह खासियत बद्दल अधिक माहिती.(मोबाईलचे Transparent Cover पिवळ्या रंगाचे झाल्यास ते पांढरे कसे करावे? जाणून घ्या सोप्पी ट्रिक)
मायस्मार्टच्या रिपोर्टनुसार, दोन्ही वेरियंटच्या किंमतीत 1 हजार रुपयांनी कमी झाल्यानंतर आता स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरियंटचा 12,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर 6जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंट आता 14,999 रुपयांना विक्री केला जाणार आहे. परंतु ऑफलाईन पद्धतीने खरेदी केला तरच याचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे.
डुअल सिम (नॅनो) असणाऱ्या सॅमसंग गॅलेक्सी एम21 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस इन्फिनिटी यु सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 19:5:9 असून प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा वापर केला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Exynos 9611 Soc ऑक्टा कोर प्रोसेरससह ग्राफिक्ससाठी माली जी72 MP3 दिला आहे. फोनमध्ये 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.
फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसरसह 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेंसर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर दिला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. जी 15 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे.