सॅमसंग आत्याधुनिक पद्धतीचा टीव्ही ( फोटो सौजन्य- Pixabay )

तंत्रज्ञानाच्या या दुनियेत नव नवे प्रयोग वारंवार केले जातात. त्यामुळे सध्या वायरसेल वस्तूंचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. म्हणूनच टीव्ही क्षेत्रातही आता सॅमसंग कंपनी ही त्यांच्या युजर्ससाठी एक खास टीव्ही येत्या काळात बाजारात आणणार आहे.
सॅमसंग घेऊन येत असलेल्या टीव्हीमध्ये आपण जो मनामध्ये विचार चॅनल बदलणार असल्याचा विचार जरी आला तरी चॅनल बदलला जाणार अशा पद्धतीची त्याची प्रतिकृती असणार आहे. तसेच प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट प्वॉइंट्स’असे नाव ठेवण्यात आले आहे. तर या कंपनीने स्वित्झरलँडच्या इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी-लॉसेन (EPFL)च्या न्यूरोप्रोस्थेटिक्स केंद्रासोबत करार केला आहे.
सॅमसंग ही कंपनी गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पावर सातत्याने काम करत आहे. तर येत्या काही काळात हा स्मार्ट टीव्ही सॅमसंग कंपनी प्रायोगिक तत्वावर उपयोगात आणणार आहे. तर या टीव्हीचा आवाज कमी जास्त करता येणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञ मेंदूचे कार्य समजून घेत असून डोक्यातील लहरींना ही समजण्याचा अभ्यास करत आहेत.