आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन योजना, ऑफर्स सादर करणाऱ्या जिओने आता फेसबुकच्या सहयोगाने 'डिजिटल उडान' (Digital Udaan) ही नवीन मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत जिओ दर शनिवारी आपल्या युजर्सशी कनेक्ट होईल. इतकंच नाही तर युजर्संना जिओ फोनचे फिचर्स, वेगवेगळे अॅप्स, फेसबुकचा वापर आणि इंटरनेट सुरक्षा याबद्दल माहिती दिली जाईल.
रिलायन्स जिओचे डिरेक्टर आकाश अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेची सुरुवात देशातील 13 राज्यातील 200 ठिकाणी करण्यात येईल. त्यानंतर येत्या काही महिन्यात सात हजार ठिकाणी ही मोहिम सुरू होईल. ही मोहिम शिक्षण, सूचना देण्यासोबतच मनोरंजन करणारी आहे. तसंच ही मोहिम देशातील प्रत्येक शहरआणि गावापर्यंत पोहचवण्याचा जिओचा मानस असून देशातील 100% जनता डिजिटल साक्षर व्हावी, हा या मागील उद्देश आहे.
'डिजिटल उडान' अंतर्गत ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून 10 भाषांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष अजीत मोहन यांनी सांगितले की, "ही मोहिम सुरु करुन फेसबुकला आनंद होत आहे. ही मोहिम नव्या इंटरनेट युजर्संना आकर्षिक करेल. त्याचबरोबर त्यांच्यासाठी विविध टेक्निक्स देखील सादर करेल."