रिलायन्स जिओने (Reliance Jio) इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅन अंतर्गत रोज युजर्सला 1.5GB चा हाय स्पीड डेडा, अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलिंगसह दिला जाईल. रिलायन्स जिओपूर्वी एअरटेल (Airtel), वोडाफोन (Vodafone) आणि बीएसएनएलने (BSNL) देखील काही प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले होते किंवा जुने प्लॅन्स रिव्हाईज केले होते. या प्लॅन्समधून युजर्सला पूर्वीपेक्षा अधिक लाभ मिळतो.
रियालन्स जिओने 149 रुपयांचा नवा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनअंतर्गत युजर्सला दररोज 1.5GB चा हायस्पीड डेटा मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल. त्याचबरोबर यात प्लॅनमध्ये युजर्सला 100 फ्री एसएमएस चा लाभ घेता येईल. याशिवाय रिलायन्स जिओचे दोन प्लॅन्स आहेत. जाणून घेऊया त्या प्लॅन्सविषयी-
रिलायन्स जिओ 349 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लॅनअंतर्गत युजर्सला दररोज 1.5GB चा हाय स्पीड डेटा मिळेल. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगचाही लाभ घेता येईल. रोज 100 फ्री एसएमएस मिळतील. या प्लॅनची व्हॅलिडिटी 70 दिवसांची असेल.
रिलायन्स जिओ 399 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB चा हायस्पीड डेटा मिळेल. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगसह रोज 100 फ्री एसएमएसचा लाभ घेता येईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची असेल.